गुरूवार, जून 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नऊवारी साडी, हिरवा चूडा अन्…; मराठी परंपरा जपत पूजा सावंतने असं केलं बॉलिवूड स्टाइल लग्न, नवऱ्याचा हात हातात घेतला आणि…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 29, 2024 | 12:27 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Pooja Sawant Siddhesh Chavan Wedding Marathi News

पूजा सावंत सिद्धेश चव्हाण विवाह सोहळा

Pooja Sawant Siddhesh Chavan Wedding : सिनेसृष्टीत लगीनघाई सुरु असताना प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री पूजा सावंत लग्नबंधनात अडकली आहे. पूजाने तिचा बॉयफ्रेंड सिद्धेश चव्हाणसह लगीनगाठ बांधली आहे. अगदी शाही थाटामाटात त्यांचा विवाहसोहळा संपन्न झाला आहे. पूजा व सिद्धेशच्या शाही विवाहसोहळ्याचे अनेक फोटो समोर आले आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीच्या घरी लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळाली होती. पूजाच्या साखरपुड्याचे, हळदी, मेहंदी, संगीत समारंभाचेही अनेक फोटो, व्हिडीओ समोर आले. यानंतर आता अभिनेत्रीने तिच्या लग्नातील खास फोटो शेअर केले आहेत.

पूजाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन त्यांचा वरमाला घालतानाचा लूक शेअर केला आहे. अगदी पारंपरिक अंदाजात पूजाचं लग्न झालं असल्याचं समोर आलं आहे. यांत नववधूवराचा खास पारंपरिक अंदाज साऱ्या रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. गेले काही दिवस अभिनेत्रीच्या घरी लग्नाची धामधूम चालू होती. नुकताच पूजाचा संगीत व हळदी समारंभ पार पडला. याचे काही फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यानंतर आता पूजा सावंत व सिद्धेश चव्हाणच्या लग्नातील मराठमोळा लूक समोर आला आहे.

आणखी वाचा – ना महागडा लेहंगा, ना अवाढव्य खर्च; रिसेप्शनसाठी पूजा सावंतने नेसली लाल रंगाची साडी, मंगळसूत्राने वेधलं लक्ष, पाहा खास फोटो

View this post on Instagram

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)

पूजाने तिच्या लग्नासाठी पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसलेली पाहायला मिळत आहे. शिवाय अभिनेत्रीने या नऊवारी साडीवर घातलेल्या पारंपरिक दागिन्यांनी, हातातील हिरव्या चुड्याने व नाकातील नथीने तिचं सौंदर्य आणखीनंच खुलून आलेलं पाहायला मिळालं. तर सिद्धार्थने लग्नासाठी खास पांढऱ्या रंगाची शेरवानी व त्यावर डिझाइनर पांढऱ्या रंगाची शाल परिधान केली होती. पूजा व सिद्धेशचा हा राजेशाही लूक साऱ्यांच्या पसंतीस पडलेला पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – “ऑस्ट्रेलियाच्या समुद्रात जीवनाची नौका…”, लग्नानंतर पूजा सावंतसाठी नवऱ्याचा हटके स्टाईल उखाणा, उपस्थितांकडून कौतुकाचा वर्षाव

पूजाचा रिसेप्शन लूकही विशेष चर्चेत राहिला. पूजा व सिद्धेशच्या रिसेप्शन लूकचेही अनेक फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. पूजा-सिद्धेशने लग्नाच्या रिसेप्शन सोहळ्यासाठी लाल रंगाची साडी व त्यावर साजेसा असा साजशृंगार केला होता. तसेच हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा व कपाळाला कुंकू असा लूक केला होता. तर पूजाचा नवरा सिद्धेशने काळ्या रंगाचा पठाणी कुर्ता व त्यावर सुंदर नक्षीकाम असलेली शाल घेतली होती.

Tags: entertainmentPooja Sawant Siddhesh ChavanPooja Sawant Siddhesh Chavan Marriage DatePooja Sawant Siddhesh Chavan traditional lookPooja Sawant Siddhesh Chavan Wedding Marathi News
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Deepika Padukone announced the news that she is going to be a mother, many Marathi celebrites have wished her

लग्नाच्या सहा वर्षांनंतर दीपिका पदुकोणने घेतला आई होण्याचा निर्णय, मराठी कलाकारांकडून कौतुक, रणवीर सिंगचाही केला उल्लेख, म्हणाले...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.