एकामागोमाग एक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकताना पाहायला मिळत आहेत. मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांपैकी प्रथमेश परब, तितीक्षा तावडे, सिद्धार्थ बोडके हे कलाकार विवाहबंधनात अडकले. या पाठोपाठ प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्रीचाही विवाहसोहळा संपन्न झाला आहे. ही अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत. पूजा सावंतच नुकतंच लग्न झालं असून तिने सिद्धेश चव्हाणसह लगीनगाठ बांधली आहे. बऱ्याच दिवसांपासून पूजाच्या लग्नाची धामधूम सुरु असलेली पाहायला मिळत होती. अखेर अगदी थाटामाटात पूजाचा लग्नसोहळा पार पडला आहे. (Pooja Sawant Siddhesh Chavan Wedding)
पूजा व सिद्देशच्या लग्नातील लूकही चर्चेत आला. मॉडर्न व पारंपरिक अंदाजात हे नवं वधुवर खूपच सुंदर दिसत होते. पूजा व सिद्धेशच्या लग्नापेक्षा चर्चा रंगली ती म्हणजे अभिनेत्रीच्या हळदी समारंभाची. पूजा व सिद्धेशच्या हळदी समारंभातील अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसले. धमाल, मस्ती, डान्स करत हा समारंभ अगदी धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. पूजाच्या हळदीतील भावुक करणारे फोटोही तुफान व्हायरल झाले. हळद लावताना अभिनेत्रीला अश्रू अनावर झालेले पाहायला मिळाले.
दरम्यान, पूजाची मैत्रीण व अभिनेत्री सुखदा खांडकेकर हिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या फोटोंनी साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेत्रीने पूजाच्या हळदीत समारंभातील खास फोटो शेअर केले आहेत. पूजाच्या हळदीत पूजासह तिच्या जिवलग सर्वच मैत्रिणी भावुक झालेल्या पाहायला मिळाल्या. दरम्यान पूजा सुखदाला मिठी मारुन रडतानाही दिसली. त्यावेळी इतर मैत्रिणीही पूजाला शांत करताना दिसल्या.
पूजा व सुखदा या खूप जुन्या मैत्रिणी आहेत. दोघींचं बॉण्डिंगही खास असल्याचं त्यांच्या फोटोंवरून नेहमीचं पाहायला मिळतं. पूजाच्या लग्नापुर्वीच्या प्रत्येक फंक्शनपासून ते अगदी लग्नापर्यंत सुखदा दिसली. एक मैत्रीण म्हणून सुखदाने लग्नातील जबाबदारीही उत्तमरीत्या सांभाळली. मैत्रीच्या प्रत्येक समारंभात तिची लगबग पाहायला मिळाली. तर लग्नात सुखदासह तिचा पती अभिजीत खांडकेकरही उपस्थित होता. दोघांनी सारख्याच रंगाचे कपडे परिधान करत हजेरी लावलेली पाहायला मिळाली.