अभिनेत्री पूजा सावंतची सध्या लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. पूजा सिद्धेश चव्हाणसह लग्नबंधनात अडकणार आहे. नुकतीच पूजाला सिद्धार्थच्या नावाची हळद लागली असून त्यांच्या हळदी समारंभातील अनेक फोटो समोर आले आहेत. बऱ्याच दिवसांपासून पूजाच्या लग्नाची धामधूम सुरु असलेली पाहायला मिळत होती. तिच्या लग्नापुर्वीच्या विधींचे अनेक फोटो, व्हिडीओही समोर आले. दरम्यान, हळदी समारंभातील काही खास व्हिडीओ साऱ्यांच्या पसंतीस पडले. (Pooja Sawant Siddhesh Chavan Haladi Ceremony)
पूजाला हळद लावताना अश्रूही अनावर झालेले पाहायला मिळाले. पूजाचा बहिणीबरोबरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. यांत पूजाची बहीण रुचिरा तिला हळद लावताना दिसत आहे. हळद लावताना दोघींनाही रडू आवरेना झालेलं पाहायला मिळत आहे. करवली म्हणून पूजाची बहीण प्रत्येक सोहळ्यात मिरवताना दिसली. बहिणीच्या लग्नाची जबाबदारीही रुचिरा अत्यंत उत्तम पद्धतीने निभावत आहे. बहिणीच्या लग्नसोहळ्याला रुचिराची धावपळ प्रत्येक व्हिडीओमधून समोर आली. यावरुन दोघी बहिणींमधील बॉण्डिंग खूप खास असल्याचं कळतंय. बहिणीच्या हळदीसाठी रुचिराचा खास लूक साऱ्यांना भावला. रुचिराच्या कानातील ‘करवली’ असं लिहिलेले कानातले लक्षवेधी ठरत आहेत.
दरम्यान, पूजाच्या हळदी समारंभातील लूकचीही चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. जांभळ्या रंगाच्या या हटके लूकमध्ये दोघेही खूपच सुंदर दिसत होते. तर पूजाच्या हातातील हिरवा चुडा आणि केसात माळलेल्या पांढऱ्या रंगाच्या गजऱ्याने तिचं सौंदर्य आणखीनच फुलून आलं होतं. पूजाने लेहेंगा-चोळी परिधान केली होती तर सिद्धेश जांभळ्या रंगाच्या कुर्ता पायजमामध्ये पाहायला मिळाला. पूजाच्या हळदीला सिनेसृष्टीतील कलाकार मंडळींनीही हजेरी लावलेली पाहायला मिळाली. साऱ्यांनी मिळून डान्स करत पूजाची हळद गाजवली.
आणखी वाचा – Video : हळद लागताच रडू लागली पूजा सावंत, मंडपातील ‘तो’ भावुक व्हिडीओ व्हायरल
थाटामाटात साजरी झालेल्या या पूजाच्या हळदी समारंभात तिच्या नवऱ्याबरोबरचा रोमँटिक अंदाजही साऱ्यांच्या पसंतीस पडला. काही दिवसांपूर्वी पूजाने सोशल मीडियावरुन तिच्या प्रेमाची जाहीर कबुली चाहत्यांसह शेअर केली. पूजाने तिचा बॉयफ्रेंड सिद्धेशबरोबरचे पाठमोरे फोटो शेअर करत साऱ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यानंतर थेट तिने तिच्या बॉयफ्रेंडचा चेहरा दाखवत लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं सांगितलं.