सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘या’ कारणांमुळे वैभव मांगले यांनी सोडले ‘अलबत्या गलबत्या’ नाटक, खुलासा करत म्हणाले, “जेव्हा नाटक सोडायचा विषय निघतो…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑगस्ट 12, 2023 | 7:33 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
vaibhav mangale on quitting popular marathi plays

'या' कारणांमुळे वैभव मांगलेने सोडले 'अलबत्या गलबत्या' नाटक, खुलासा करत म्हणाले, "जेव्हा नाटक सोडायचा विषय निघतो…"

नाटक, मालिका व चित्रपट या सर्वच माध्यमांमध्ये आपला अभिनयाचा डंका वाजवणारे अभिनेते म्हणजे वैभव मांगले. केवळ अभिनयातच नाही, तर गायनामध्येही वैभव मांगले यांनी आपली झलक दाखवली आहे. सर्वसामान्य कुटुंबातून आलेले अभिनेते वैभव मांगले हे सुरुवातीच्या काळात नोकरी करत होते. मात्र जेव्हा ते मुंबईत आले, तेव्हा त्यांनी नाट्यस्पर्धेतून आपली कला प्रेक्षकांसमोर सादर केली. वैभव मांगले यांनी अनेक माध्यमांमधून विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या असून त्यातूनच त्यांनी मराठी कलाविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. (Vaibhav Mangale)

पत्रकार सौमित्र पोटे यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना अभिनेते वैभव मांगले यांनी अनेक मुद्द्यांवर स्पष्ट मत व्यक्त केले आहे. एकीकडे वैभव मांगले यांचं ‘अलबत्या गलबत्या’ नाटक गाजत असताना त्यांनी ते नाटक का सोडलं ? याबद्दल विचारला असता वैभव मांगले यांनी हे नाटक सोडण्यामागचं कारण सांगितले आहे.

हे देखील वाचा – “मला लग्न करायचं आहे पण…”, पूजा सावंतचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली, “पैसा कधीही…”

अभिनेते वैभव मांगले म्हणाले, “एका मोठ्या चॅनेलने ‘अलबत्या गलबत्या’ नाटकाची निर्मिती केली. त्यावेळेला अत्यंत हुशार आणि मिश्किल असणारा निलेश मयेकर त्या चॅनेलचा हेड होता. त्याने हा प्रस्ताव माझ्यासमोर ठेवला आणि म्हणाला, ‘जर तू हे नाटक करणार असेल तर हे नाटक आपण करू’. तेव्हा ते चॅनेल इतकं टॉपला होता, की लोकं त्या चॅनेलमधील सगळे कार्यक्रम बघायचे. तेव्हा बालनाट्य करायचा का नाही, असा प्रश्न माझ्यासमोर होता. पण निलेशचा माझ्यावर विश्वास होता, हे माहित होतं. त्याच्याआधी हॅम्लेट नाटक आलं तेव्हा या दोन्ही नाटकांना अक्षरशः डोक्यावर घेतलं. त्यामुळे मी या नाटकाचे प्रयोग केले, आणि त्याचे पैसेदेखील आम्हाला मिळाले.”

हे देखील वाचा – …अन् ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम श्याम राजपूतला प्राजक्ता माळीने शिकवलं मेडिटेशन, म्हणाले, “या दोन महिन्यांमध्ये मी…”

“पण जेव्हा नाटक सोडायचा विषय निघतो. तेव्हा याचं कारण होतं, ते एका काळानंतर चॅनेलचे मार्केट खाली उतरल्यामुळे नाटकाचे बुकिंग उतरले. दुसरं आहे ते आम्ही सुट्ट्यांच्या काळात नाटक करायचो, कारण मुलं त्यावेळी मोकळी असायची. पण असा प्रयोग दीड वर्ष केल्यामुळे नाटकाचा प्रेक्षकवर्ग कमी झाला. नंतर कोरोना, आणि निर्मात्याशी असलेल्या वादामुळे हे नाटक सोडावं लागलं. केवळ मी निलेश मयेकरमुळे हे नाटक केलं आहे. असाच अनुभव मला ‘करून गेलो गाव’ मध्येही आला होता.”, असा वैभव मांगले म्हणाले. (Vaibhav Mangale)

वैभव मांगले यांची ‘अलबत्या गलबत्या’, ‘वाडा चिरेबंदी’, ‘करून गेलो गाव’ ही नाटक विशेष गाजली आहेत. शिवाय सोशल मीडियावरही ते प्रचंड सक्रिय असून अनेकदा विविध घडामोंडीवर व्यक्त होताना दिसतात.

Tags: marathi natakvaibahv mangale
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Gashmeer Mahajani Answers to Trollers

नितिन देसाईंना श्रद्धांजली वाहताच ट्रोल झालेल्या गश्मीर महाजनीने नेटकऱ्याला दिलं सडेतोड उत्तर, म्हणाला, "तुम्ही खूप…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.