शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Suruchi Adarkar Piyush Ranade Wedding : शाही थाट, पारंपरिक लूक अन्…; सुरुची अडाकर व पियुष रानडेच्या लग्नाची जोरदार चर्चा, मंगळसूत्राची डिझाइन आहे फारच खास

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 6, 2023 | 2:23 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Piyush Ranade and Suruchi Adarkar Wedding

शाही थाट, पारंपरिक लूक अन्...; सुरुची अडाकर व पियुष रानडेच्या लग्नाची जोरदार चर्चा, मंगळसूत्राची डिझाइन आहे फारच खास

Piyush Ranade and Suruchi Adarkar Wedding : सिनेसृष्टीत असे बरेच कलाकार आहेत ज्यांची लग्न विशेष चर्चेत राहिली. इतकंच नव्हे तर कलाकार मंडळींच्या पत्नीच्या मंगळसूत्राने अधिक लक्ष वेधून घेतलं. कलाकारांच्या गळ्यातील मंगळसूत्र हे प्रेक्षकांसाठी अधिक खास असतं. कारण प्रेक्षक या हटके मंगळसूत्राच्या डिझाइन्स फॉलो करताना दिसतात. आजवर ऋता दुर्गुळे, अभिज्ञा भावे, मिताली मयेकर, शिवानी रांगोळे या अभिनेत्रींच्या मंगळसूत्राची विशेष चर्चा रंगली.

अशातच एक मराठमोळी कलाकार जोडी नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेत्रीने गुपचूप लग्न करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. अभिनेत्री सुरुची अडारकर विवाहबंधनात अडकली आहे. अभिनेता पियुष रानडेसह तिने लग्न करत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आणखी वाचा – लग्नबंधनात अडकली सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री सुरुची अडारकर, शाही विवाहसोहळ्याचे फोटो समोर

सुरुची व पियुष यांचा शाही विवाहसोहळा संपन्न झाला असल्याचं समोर आलं आहे. अगदी पारंपरिक अंदाजात त्यांनी हा विवाहसोहळा उरकला आहे. लग्नासाठी सुरुची व पियुष यांचा खास लूक पाहणं रंजक ठरतंय. सुरुचीने पिवळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. तसेच तिच्या दागिन्यांनीही विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. तर पियुषने सुरुचीच्या लूकला साजेसा पोशाख परिधान केला आहे. अशातच नव्या नवरीच्या मंगळसूत्राने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

View this post on Instagram

A post shared by ???????????????????????????? N ???????????????????????????? (@suruchiadarkar)

आणखी वाचा – मुग्धा वैशंपायनच्या बहिणीचा विवाहसोहळा संपन्न, पारंपरिक लूकमध्ये दिसत आहे फारच सुंदर, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

सुरुची व पियुषचा लग्नातील फोटो समोर आला आहे. या सुंदर फोटोमध्ये पियुष तिला मंगळसूत्र घालताना दिसत आहे. सुरुचीच्या मंगळसूत्रात मोजके काळे मणी आणि दोन वाट्याचे पेंडेंट आहे. काळ्या मणीमध्ये सोन्याचे असलेले मणी व छान पेन्डंट असलेल्या या मंगळसूत्रावरून नजर हटत नाही आहे. सुरुचीने फोटो शेअर करताच चाहत्यांसह कलाकार मंडळींनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Tags: entertainmentmarathi actormarathi actressPiyush RanadePiyush Ranade and Suruchi Adarkar WeddingSuruchi Adarkar
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
bigg boss 17 vicky jain will be nominate to ankita lokhande new promo viral on social media

Bigg BOSS 17 : ‘बिग बॉस’मुळे अंकिता लोखंडे व विकी जैनमधील वाद पेटणार, नवरा-बायकोचं भांडण पाहून प्रेक्षकही भडकले, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.