सध्या सिनेसृष्टीत सर्वत्र लग्नाचे वारे वाहू लागले आहेत. प्रसाद-अमृता यांच्या लग्नाने तर सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या पाठोपाठ आता ‘सारेगमप लिटल चॅम्प्स’ फेम मुग्धा वैशंपायन हिच्या घरीही लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. ‘सारेगमप लिटल चॅम्प्स’मधील मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे यांनी ‘आमचं ठरलं’ म्हणत चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर केली. त्यानंतर आता सगळ्या चाहत्यांच्या नजरा मुग्धा-प्रथमेशच्या लग्नाकडे लागून राहिल्या आहेत. (Mugdha Vaishampayan Sister Wedding)
अशातच मुग्धा वैशंपायनच्या घरी लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. मात्र वैशंपायन यांच्या घरी मुग्धाचं लग्न नसून तिच्या मोठ्या बहिणीचं मृदुल हिचं लग्न आहे. मुग्धाच्या बहिणीची जोरदार लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. दोन, तीन दिवसांपासून तिच्या लग्नाआधीच्या विधींचे अनेक फोटोस सोशल मिडीआयवर व्हायरल झालेले पाहायला मिळाले.
प्रथमेश लघाटेने खास मेहुणीच्या मेहंदी सोहळ्याचा फोटो शेअर केला होता. त्यानंतर मुग्धानेही तिच्या ताईचा मेहंदीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. मुग्धाने ताईला हळद लागल्यानंतरचा एकत्र फोटो पोस्ट करत त्या फोटोला ताईची हळद असं कॅप्शन दिलं होतं. त्यानंतर मुग्धाच्या बहिणीचे ग्रहमखचे फोटो समोर आले. या तिच्या ग्राहमखच्या फोटोंनी लक्ष वेधून घेतलं आहे. अत्यंत साधेपणाने हे सगळे विधी पार पडत आहेत. यांत तिच्या बहिणीचा पारंपरिक अंदाज साऱ्यांचं लक्ष वेधून घेत होता.
त्यानंतर आज मुग्धाच्या बहिणीचं लग्न आहे. तिच्या बहिणीच्या लग्नाचा फोटोही नुकताच समोर आला आहे. पारंपरिक अंदाजात नववधूवराचा लूक लक्ष वेधून घेत आहे. केळीच्या मंडपात व फुलांच्या सजावटीत त्यांचा लग्नसोहळा होत आहे. यांत मुग्धाच्या बहिणीने व तिच्या होणाऱ्या नवऱ्याने लाल रंगाचे पारंपरिक कपडे परिधान केले आहेत. मुग्धाच्या बहिणीची लाल रंगाची साडी व तिच्या नवऱ्याने नेसलेलं सोहळ साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. मुग्धाच्या बहिणीच्या हातातील हिरव्या रंगाचा शेला विशेष आकर्षण ठरत आहे. मुग्धाच्या बहिणीच्या लग्नातील मुग्धा व प्रथमेशचा लूक अजून समोर आला नसून चाहत्यांच्या नजरा त्यांच्या लुककडे लागून राहिल्या आहेत.