गुरूवार, जून 5, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अंकिता लोखंडेने भांगेत भरलं जांभळ्या रंगाचं कुंकू, अवतार पाहून नवऱ्यानेच सगळ्यांसमोर उडवली खिल्ली, पुढे असं काही घडलं की…

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 1, 2024 | 1:17 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
ankita lokhande troll

अंकिता लोखंडेने जांभळे कुंकू लावल्याने नेटकऱ्यांचा संताप

Ankita Lokhande purple sindoor : टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून अभिनेत्री अंकिता लोखंडे घराघरात पोहोचली. त्यानंतर ती मालिका, कार्यक्रम व हिंदी चित्रपटांमध्ये दिसून आली आहे. तिच्या प्रत्येक भूमिकेचे प्रेक्षकांनी कौतुकदेखील केले आहे. सध्या ती ‘लाफ्टर शेफ’ या कार्यक्रमामध्ये दिसून येत आहे. या शोचे सूत्रसंचालन भारती सिंह करत असून अंकिताबरोबर तिचा पती विकी जैनदेखील सहभागी झाला आहे. याआधी दोघंही ‘बिग बॉस’मध्येही दिसून आले होते. यावेळी दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात वाददेखील झाले होते. घराबाहेर आल्यानंतर दोघ घटस्फोट घेणार अशा चर्चादेखील सुरु झालया होत्या. मात्र असे काहीच न होता दोघांच्या नात्यामध्ये कोणतीही अडचण नसल्याचे स्पष्ट झाले होते.

सध्या अंकिता व विकी दोघंही सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात सक्रिय असलेले पाहायला मिळतात. त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओ ते चाहत्यांबरोबर शेअर करताना दिसतात. अंकिताचा ग्लॅमरस लूक यामध्ये अनेकदा पाहायला मिळतो. या फोटो व व्हिडीओना चाहत्यांची मोठ्या प्रमाणात पसंतीदेखील मिळते. तर काही वेळेस तिला ट्रोलदेखील केले जाते. नुकताच तिच्या बाबतीत पुन्हा हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

आणखी वाचा – Paaru Serial : पारूची प्रार्थना आदित्यला वाचवणार का?, अपघाताचं संकट अखेर टळणार का?, नक्की काय घडणार?

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सध्या दोघंही एकत्रितपणे ‘लाफ्टर शेफ’ या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आहेत. या कार्यक्रमामधील त्यांच्या परफॉर्मन्सने खूप पसंती मिळत आहे. मात्र तिने एका एपिसोडच्या केलेल्या लूकमुळे पुन्हा एकदा तिला ट्रॉलिंगचा सामना करावा लागला आहे. कार्यक्रमाच्या सेटवरुन विकी, अंकिता व अली गोनी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तिघंही मजा-मस्करीच्या अंदाजात दिसत आहेत. यामध्ये अंकिताच्या लूकवर सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत. तिच्या वेगळ्या लूकची सर्वत्र चर्चा होताना दिसून येत आहे. यामध्ये तिने लाल कुंकवाऐवजी जांभळ्या रंगाचे कुंकू लावले आहे.

आणखी वाचा – प्रतिमाला खुश ठेवायला सुभेदार कुटुंबाची धावपळ, तर तन्वी-अर्जुनमधील जवळीकता सायलीला खटकणार?, मालिकेत मोठं वळण

हा व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी अंकिताला ट्रोल केले आणि काही प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले की, “फॅशनच्या  नावावर काहीही करशील का?”, दुसऱ्या नेटकाऱ्याने लिहिले की, “प्रसिद्धीसाठी काहीही करायचं असतं”. दरम्यान याचवेळी निया शर्माचादेखील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तिने ओठांना काळ्या रंगाची लिपस्टिक लावलेली दिसून येत आहे. यावरुन नियालादेखील मोठ्या प्रमाणात ट्रोल केले गेले होते.

Tags: ankita lokhandepurple sindoortroll
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Chahat Khanna Personal life
Entertainment

आजारी असतानाही शरीरसंबंध ठेवायचा आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जून 4, 2025 | 6:00 pm
Nivedita saraf talk about ashok saraf
Entertainment

“इतरांप्रमाणे दुसऱ्यांचे डायलॉग न कापता…”, पत्नी निवेदितांकडून अशोक सराफांचं तोंडभरुन कौतुक, म्हणाल्या, “दुसऱ्याला बरोबर घेऊन…”

जून 4, 2025 | 5:48 pm
Dipika Kakar Health
Entertainment

दीपिका कक्करची कॅन्सरवर मात, १४ तास सुरु होती शस्त्रक्रिया, नवऱ्याने दिली अपडेट, म्हणाला, “आता आयसीयूमध्ये…”

जून 4, 2025 | 4:24 pm
Jaya bachchan angry on paparazzi
Entertainment

Video : “निघा इथून, सगळेच घाणेरडे”, फोटोग्राफर्सवर अचानकच भडकल्या जया बच्चन, गाडीमध्ये बसूनही ओरडत राहिल्या अन्…

जून 4, 2025 | 3:29 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 Update Utkarsh Shinde praised Suraj Chavan

Bigg Boss Marathi : "मोठमोठ्या संकटांना हरवून इथे आलास आणि…", सूरज चव्हाण मराठी इंडस्ट्रीमधून फुल्ल सपोर्ट, अभिनेता म्हणाला, "शिकलेल्या माणसांना…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.