शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : साताऱ्यात ‘पारू’चं शूट करत असताना बायकोच्या आठवणीत प्रसाद जवादे व्याकुळ, अमृता म्हणाली, “तू माझा…”

Saurabh Moreby Saurabh More
मे 20, 2024 | 11:34 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Paru fame Prasad Jawade shared a video in memory of his wife Amruta Deshmukh.

Video : साताऱ्यात 'पारू'चं शूट करत असताना बायकोच्या आठवणीत प्रसाद जवादे व्याकुळ, अमृता म्हणाली, "तू माझा..."

कलाकार मंडळी हे शूटिंगनिमित्त बरेचदा घरापासून दूर असतात. कामानिमित्त त्यांना घरापासून दूर राहून शूटिंग करावं लागत. त्यामुळे साहजिकच त्यांना त्यांच्या जवळच्या माणसाची आठवण ही येतच असणार. त्यामुळे कधीकधी काही कलाकार आपल्या माणसांच्यात व्याकुळ होताना दिसतात. असाच एक अभिनेता त्याच्या बायकोच्या आठवणीत व्याकुळ झाला आहे आणि हा अभिनेता म्हणजे प्रसाद जवादे.

प्रसाद हा सध्या त्याच्या ‘पारू’ या मालिकेच्या शुटिंगनिमित्त साताऱ्यात वास्तव्यास आहे आणि तिथे त्याला त्याच्या पत्नीची म्हणजेच अमृता देशमुखची आठवण येत आहे. अमृताच्या आठवणीबद्दल त्याने अनेक मुलाखतींमधून सांगितले आहे. अशातच आता प्रसादने अमृताच्या आठवणीत सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. ‘लापता लेडीज’मधील ‘ओ सजणी’ हे गाणं या गाण्याद्वारे त्याने अमृताची आठवण येत असल्याचे म्हटले आहे. “हे गाणे सध्या माझ्या आयुष्याशी संलग्न होत आहे” असं म्हणत त्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याच्या या व्हिडीओवर अमृताने ही कमेंट करत त्याला लापता लेडीजच्या ‘फूल’ची उपमा दिली आहे.  

View this post on Instagram

A post shared by Prasad Jawade (@prasadjawade)

आणखी वाचा – अप्पी सिंबाला सांगणार त्याच्या बाबांची गोष्ट, अमोलच्या वाढदिवसाला तरी होणार का त्याची बाबांबरोबर भेट?, नवा प्रोमो

‘बिग बॉस’मुळे प्रसाद-अमृता ही जोडी प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली होती. गेल्या वर्षी जुलै महिन्यात दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. तेव्हापासून चाहते अमृता-प्रसादच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते. अशातच त्यांनी नोव्हेंबरमध्ये एकमेकांबरोबर विवाहगाठ बांधली. लग्नानंतर दोघांनी त्यांच्या आयुष्यातएल काही खास क्षण त्यांच्या चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. त्यांच्या या खास क्षणांना त्यांचे चाहतेही भरभरून प्रतिसाद देत असतात.   

आणखी वाचा – सायली-अर्जुनमध्ये नवं कॉन्ट्रॅक्ट?, प्रपोजही करणार, बहरणार प्रेमाचं नातं अन्…; मालिकेत मोठा ट्विस्ट

दरम्यान, अमृता तिच्या नाटकाच्या दौऱ्यानिमित्त मुंबई, पुणेसह अवघ्या महाराष्ट्रभरात फिरत असते, तर प्रसाद त्याच्या ‘पारू’ मालिकेच्या शूटिंगनिमित्त साताऱ्यात असतो. हे दोघे त्यांच्या व्यस्त कामातून वेळ काढत एकमेकांना भेटत असतात. त्यांच्या या भेटीचे काही खास क्षणही ते शेअर करत असतात. अशातच प्रसादने शेअर केलेला हा व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

Tags: amruta deshmukhmarathi entertainment newsprasad jawade
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Marathi  Celebrity Voting Loksabha Election

मतदानासाठी सिनेसृष्टीही सरसावली, कलाकारांमध्ये मतदानाचा उत्साह, फोटो केले शेअर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.