झी मराठीवरील सध्या सर्वच मालिका या चांगल्याच चर्चेत आहेत. यापैकी एक मालिका म्हणजे ‘पारू’. छोट्या पडद्यावरील ही मालिका सध्या प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. या मालिकेतील पारू-आदित्य ही जोडीही चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. पारू ही भूमिका अभिनेत्री शरयू सोनवणे साकारत आहे, तर आदित्य ही भूमिका अभिनेता प्रसाद जवादे साकारत आहे. मालिकेत सध्या पारू व आदित्य यांच्या लग्नाचे कथानक सुरु असून या दोघांचे लग्न व्हावे असं चाहत्यांनाही वाटत आहे. त्यामुळे पारू-आदित्य यांची केमिस्ट्री चाहत्यांना विशेष आवडत आहे.
मालिकेतील पारू-आदित्य यांच्याबरोबरच प्रसाद जवादे व अमृता देशमुख ही जोडीही चांगलीच चर्चेत असते. ‘बिग बॉस मराठी’मधून या जोडीचा प्रवास सुरु होऊन या दोघांनी एकमेकांबरोबर विवाहगाठ बांधली. लग्नानंतर पहिल्यांदाच अमृताच्या घरी प्रसादचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्रसादच्या सासरी जावयाचं जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं. याचा एक व्हिडीओ अमृताच्या आईने त्यांच्या युट्यूब चॅनेलद्वारे शेअर केला असून या व्हिडीओमधून अमृताच्या घराची खास झलक पाहायला मिळत आहे.
या व्हिडीओमध्ये अमृताच्या प्रशस्त घराची झलक दिसत आहे. अमृताच्या घरातील हॉलमधील सर्व भिंतींवर श्रीकृष्णाच्या पेंटिग्ज लावल्या आहेत. त्याचबरोबर हॉलमध्ये मोठा डायनिंग टेबलही या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. याच डायनिंग टेबलच्या मागील भिंतीवर देशमुख कुटुंबियांचा मोठा फोटोही पाहायला मिळत आहे. यामध्ये अमृता, तिचे आई-वडील व भाऊ अभिषेक व त्याची पत्नीही आहे. अनेक आकर्षक इंटीरिअरने अमृताचे घर सजलेले असून तिच्या घरातील अनेक आकर्षक वस्तूंनीही लक्ष वेधून घेत आहेत.
दरम्यान, आदित्य हा सध्या पारू या मालिकेतून त्याच्या चाहत्यांच्या भेटीला येत आहे. तर त्याची पत्नी अमृता देशमुख ही तिच्या नाटकातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे आणि दोघांच्या या कलाकृतींना प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.