शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“जेव्हा पैसे खूप कमी मिळतात तेव्हा…”, प्रसाद ओक-गौरव मोरेचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; म्हणाला, “जगातील अंतिम सत्य…”

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 26, 2023 | 2:26 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Prasad oak Gaurav more funny video

Prasad oak Gaurav more funny video

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणजे प्रसाद ओक. गेल्या अनेक वर्षांपासून त्याने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. नाटक, मालिका किंवा चित्रपट या सर्वच माध्यमातून त्याने उत्कृष्ट अभिनय साकारला आहे. तो सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. नुकताच त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता गौरव मोरे याच्यासह दिसला. हे दोघेही लवकरच ‘महापरिनिर्वाण’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या शुटिंगला सुरु झाली आहे. चित्रपटाच्या शूटिंगनिमित्त तसेच व्यावसायिक कामासाठी दोघेही एकत्र प्रवास करताना पाहायला मिळतात. त्यावेळी ते विविध ट्रेण्डिंग गाण्यावर तसेत विषयावर व्हिडियो बनवतात. नुकत्याच प्रसादने एक व्हिडिओ शेअर केला आहे. (Prasad oak Gaurav more funny video)

या व्हिडिओत प्रसाद गौरवला “जगातलं अंतिम सत्य’ सांगताना पाहायला मिळतो. व्हिडिओत प्रसाद गौरवला विचारतो की, “सांगलीत आलास. ऐवढा मोठा चित्रपट करतो आहेस. कसा, काय अनुभव?”. त्यावर उत्तर देताना गौरव प्रसादला सांगतो, “सर काय सांगू मी! या चित्रपटातून इतकं शिकलो.  या चित्रपटातून मला खूप काही शिकायला मिळालं. तुम्ही आहात, आजूबाजूला लोकं आहेत. मी खरंच खूप शिकलो”, असं म्हणतो.  पुढे प्रसाद गौरवला स्पष्टीकरण देताना सांगतो, “मला अनुभव जास्त आहे म्हणून तुला एक सांगतो. जगातल्या कुठल्याही क्षेत्रात जेव्हा पैसे खूप कमी मिळतात ना तेव्हा माणूस हे वाक्य म्हणतो, खूप शिकायला मिळालं. असं काही नसतं”.

View this post on Instagram

A post shared by PRASAD OAK : प्रसाद ओक (@oakprasad)

आणखी वाचा – नियॉन रंगाचा ड्रेस, हातात बांगड्या अन्…; थाटात सासरी पोहोचली परिणीती चोप्रा, गळ्यातील हटके मंगळसूत्राने वेधलं लक्ष

या विनोदी व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही विनोदी पद्धतीने कमेंट केले आहेत. एक नेटकरी लिहीतो, ‘नवीन जॉईन केलेल्या अ‍ॅव्हरेज नोकरदाराला पगार कमी आहे. पण शिकायला खूप मिळत आहे’, असं म्हणत नेटकरी स्वतःची परिस्थिती सांगत हसून दाखवलं आहे. तर दुसरा नेटकरी, ‘एवढं पण खरं नव्हतं बोलायचं’, अशी कमेंट केली आहे.

View this post on Instagram

A post shared by PRASAD OAK : प्रसाद ओक (@oakprasad)

आणखी वाचा – Video: ‘लक्ष्मी आली घरी’ म्हणत राहुल वैद्यच्या आई-बाबांनी केलं नातीचं स्वागत, म्हणाला, “यापेक्षा जास्त…”

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीदिनाला महापरिनिर्वाण दिन असं म्हटलं जातं. ६ डिसेंबर १९५६ ला दिल्लीतील बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासस्थानी त्यांचं निर्वाण झालं होतं. त्यांच्या निधनाने सर्वांना मोठा धक्का बसला होता. या सर्व क्षणांवर आधारित महापरिनिर्वाण चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

Tags: funny videogaurav moremarathi actorprasad oak
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Farrey Teaser

'फर्रे'चा टीझर अखेर प्रदर्शित, सलमान खानची भाची अलिजेहचं बॉलिवूडमध्ये पदार्पण, व्हिडीओ पाहिलात का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.