मंडळी क्षेत्र कोणतंही असो तुमचा चाहता वर्ग तुम्हाला आनंदात पाहण्यासाठी काहीही करू शकतो. सध्या मनोरंजनविश्वातील अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्डा यांच्या लग्नाची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे. या चर्चाना उधाण आलेलं असताना परिणितीचे फॅन्स या बातमीने भलतेच खुश दिसतायत. यंदाचा ipl सिझन ही चांगलाच गाजतोय आणि याच गाजणाऱ्या सिझन मध्ये पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्सची मतच पाहण्यासाठी या चर्चेत असणाऱ्या जोडीने हजेरी लावली. मॅच तर चांगली चालू होतीच पण परिणीती आणि राघव याना स्टेडियम मध्ये बघून चाहत्यांनी एकच जल्लोष सुरु केला.(Parineeti Chopra Raghav Chadha)

काहींनी तर अक्षरशा परिणीती भाभी जिंदाबाद च्या घोषणा देण्यास सुरुवात केली आणि काही क्षणातच स्टेडियम भर या घोषणा काही क्षणांसाठी ऐकू येऊ लागल्या. सध्या दोघांच्या साखरपुड्याची बरीच चर्चा आहे. १३ मे रोजी दोघेही साखरपुडा करणार असल्याचं बोललं जात होतं, मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी ईडीच्या आरोपपत्रात राघवचं नाव आल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं. मात्र, आरोपपत्रात राघवचं नाव आरोपी म्हणून नाहीये. ईडीने त्याला केवळ चौकशीसाठी बोलावलं आहे.(Parineeti Chopra Raghav Chadha)