रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तिच्याशिवाय घर खायला उठायचं”, शेफाली जरीवालाच्या आठवणीत पती झालेले भावुक, म्हणालेले, “तिची खरी किंमत…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 2, 2025 | 5:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Parag Tyagi On Shefali Jariwala

"तिच्याशिवाय घर खायला उठायचं", शेफाली जरीवालाच्या आठवणीत पती झालेले भावुक, म्हणालेले, "तिची खरी किंमत…"

Parag Tyagi On Shefali Jariwala : अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या अचानक मृत्यूमुळे सर्वांना धक्का बसला. या धक्क्यातून अद्याप कुटुंबातील सदस्यहे सावरलेले नाहीत. वयाच्या ४२व्या वर्षी बीपी कमी झाल्यानं हार्टअटॅक येत अभिनेत्रीचा मृत्यू झाला. या सगळ्यात अभिनेत्रीचा पती अभिनेता पराग त्यागी पूर्णतः खचला. पत्नीच्या निधनाने पतीवर दुःखाचा डोंगर कोसळला. अभिनेत्रीच्या अंतिम संस्कारावेळी तिचा पती अस्थी हातात घेऊन ढसाढसा रडतानाही रडला. दरम्यान, पराग याने जुन्या मुलाखतीदरम्यान अभिनेत्रीच्या ‘बिग बॉस १३’ मध्ये जाण्याबाबत, आणि त्यावेळेच्या परिस्थितीबाबत सांगितले. त्याने म्हटले होते की आपल्या पत्नीपासून दूर राहणे त्याला फार कठीण जात आहे, हा खूप कठीण काळ आहे. तो काळ त्याच्यासाठी खूप आव्हानात्मक होता.

‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने पराग त्यागी ‘इटाइम्स टीव्ही’ शी बोलताना म्हणाला, शेफाली ‘बिग बॉस १३’च्या घरात असताना घर कसं त्याला खायला उठायचं याबाबत त्याने भाष्य केलं. तो म्हणाला होता, “कधीकधी आम्ही आपल्या आयुष्यात खूप समाधानी असतो. मला माहित आहे की मला शेफाली जरीवाला आवडते परंतु मला किती हे माहित नाही. जेव्हा ती बिग बॉस हाऊसमध्ये गेली, तेव्हा मला ती कळली. जेव्हा ती माझ्यापासून दूर होती तेव्हा मला तिची किंमत कळली”.

आणखी वाचा – ‘ठरलं तर मग’ मालिका संपणार?, विलास केस मर्डरबाबत सायलीचा मोठा खुलासा, म्हणाली, “शेवटचे दिवस…”

त्याने सांगितले की, “मला प्रत्येक क्षणी तिची आठवण येते. घर तिच्याशिवाय रिक्त होते. जेव्हा मी काही गोष्टी शेअर करायचो तेव्हा मला तिची सर्वात जास्त आठवण यायची आणि ती माझ्या जवळ नव्हती. मी संपूर्ण रहस्य जागृत करायचो. आठवणींमध्ये रामायचो. मी माझ्या पालकांसह शेअर करायचो पण मी नेहमीच त्यांच्याबरोबर सर्व काही शेअर केले आहे आणि ती तिथे नव्हती”.

आणखी वाचा – वय, वजन वाढण्याची भीती आणि…; शेफालीच्या मृत्यूनंतर श्रीदेवीच्या कॉस्मेटिक सर्जरीमागच्या रहस्याचा अभिनेत्रीकडून खुलासा, म्हणाली…

पराग त्यागी म्हणाला होता की, लोकांनी त्याला शेफाली जरीवालाचा नवरा म्हणून ओळखले पाहिजे. अभिनेत्रीच्या मृत्यूमुळे अभिनेता पूर्णतः खचला आहे. तो तिला परी अशी हाक मारायचा. त्याने माध्यमांकडे हात जोडत आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करण्यास सांगितले. अभिनेत्रीची अस्थी मुंबईतील जुहू बीचवर विसर्जित करण्यात आली आणि त्या काळात तिची आई आणि पती दोघांचीही स्थिती पाहिल्यानंतर प्रत्येकाचे मन रडत होते.

Tags: bollywood gossipparag tyagiShefali Jariwala Death
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Sharad Upadhye On Nilesh Sable

डोक्यात हवा गेली, चॅनेलने बाहेर काढलं अन्…; प्रसिद्ध राशिचक्रकारांचा निलेश साबळेंना टोला, म्हणाले, "सर्वनाश होतो आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.