‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये सोनू भिडेची भूमिका साकारणारी पलक सिधवानी सध्या चर्चेत आली आहे. करार मोडल्याबद्दल निर्माते अभिनेत्रीला कायदेशीर नोटीस पाठवण्याचा विचार करत असल्याची चर्चा होती. मात्र, अभिनेत्रीने हे वृत्त फेटाळून लावले आणि खोटे असल्याचे म्हटलं आहे. पण आता नीला फिल्म प्रॉडक्शन या प्रॉडक्शन हाऊसने नोटीस पाठवल्याचे निवेदन जारी केले आहे. त्याचवेळी पलकच्या टीमनेही एक निवेदन जारी करुन निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत. प्रॉडक्शन हाऊसने एक प्रेस स्टेटमेंट जारी करत सांगितले की, नीला फिल्म प्रॉडक्शनने, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये ‘सोनू भिडे’ची भूमिका साकारणाऱ्या पलक सिधवानीला अधिकृत कायदेशीर नोटीस पाठवली आहे. (Palak Sindhwani Accuses Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)
प्रॉडक्शनकडून प्रसारित करण्यात आलेल्या नोटीसमध्ये कराराचा भंग केल्याचा उल्लेख आहे, ज्यामुळे पात्र, मालिका व निर्मिती कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. पलक सिधवानी लेखी परवानगीशिवाय शो व्यतिरिक्त इतर गोष्टींमध्ये गुंतली होती. त्यांना अनेकवेळा तोंडी व लेखी ताकीद देण्यात आली मात्र त्यांनी कोणतीही सुधारणा केली नाही. तिने कराराचे उल्लंघन सुरुच ठेवले. त्यामुळे आता निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवणे भाग पडले आहे.
यावर उत्तर देत पलकने निर्मात्यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. “पलकने कोणत्याही कराराचे उल्लंघन केलेले नाही. निर्मात्यांनी अभिनेत्रीबद्दल जे काही सांगितले आहे ते सर्व खोटे व बनावट आहे. प्रॉडक्शन हाऊसने पलकला बदनाम करण्यासाठी, त्रास देण्यासाठी आणि इजा करण्यासाठी तयार केलेली ही खोटी कथा आहे. प्रॉडक्शन हाऊसने तिच्यावर लावलेले सर्व आरोप पलकने फेटाळले आहेत”.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : जान्हवीचा नवरा घरात येताच पॅडी कांबळेची मागितली माफी, बायकोला रडू अनावर, व्हिडीओ व्हायरल
पलकच्या टीमने निवेदनात म्हटले आहे की, शो साइन करण्यापूर्वी अभिनेत्री इतर जाहिराती वेबसीरिज करत होती. करारावर स्वाक्षरी करताना तिने एकदा वाचण्याची परवानगी मागितली होती पण तिला नकार देण्यात आला. वारंवार आग्रह केल्यावर, वाचण्यासाठी सूचना देण्यात आल्या. याव्यतिरिक्त, जेव्हा पलकने विचारले की तिला शोसह इतर असाइनमेंट्स/अँडोर्समेंट्स घेण्यापासून रोखले जाणार नाही, तेव्हा निर्मात्यांनी सहमती दर्शवली की ती इतर कलाकारांप्रमाणे बाहेरची काम करु शकते. मात्र त्यांनी कराराची प्रत मागितली असता ती तिला देण्यात आली नाही.