Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचे अवघे काही दिवस शिल्लक उरले आहेत. या पर्वाचे काही दिवस उरले असून आता स्पर्धकांच्या कुटुंबीयांची भेट ही ‘बिग बॉस’च्या घरात होताना पाहायला मिळतेय. तब्बल दोन महिन्यांनी कुटुंबीयांना पहिल्यांदा समोर पाहून स्पर्धकांचा अश्रूंचा बांध फुटला असल्याचे पाहायला मिळालं. सगळ्यांचे डोळे पाणावलेले दिसतायेत तसेच सगळेच जण आपापल्या कुटुंबीयांना भेटण्यास उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे. ही स्पर्धक मंडळी सध्या त्यांच्या शेवटच्या दिवसात ट्रॉफीपर्यंतचा प्रवास पूर्ण करण्याच्या मार्गावर दिसत आहेत.
अशातच ‘बिग बॉस’च्या घरात कुटुंबीयांचा सहवास लाभला याचे काही प्रोमो आणि याचा काही भाग प्रदर्शित करण्यात आला. नुकतीच ‘बिग बॉस’च्या घरात जान्हवी किल्लेकरच्या लेकाने आणि नवऱ्याने एन्ट्री घेतलेली पाहायला मिळाली. तब्बल दोन महिन्यांनी जान्हवीला पाहून ती त्याला भरपूर मिठी मारुन किस करु लागली. तर थोड्या वेळाने तिचा नवरा ही ‘बिग बॉस’च्या घरात आला. नवऱ्याला पाहून जान्हवी खूपच खुश झाली आणि तिने त्याला घट्ट अशी मिठी मारली. मिठी मारून ती त्याच्या कुशीत ढसाढसा रडताना दिसली.
‘बिग बॉस’च्या घरात आल्यावर जान्हवीला तिच्या नवऱ्यानं थोडा रागावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला. शिवाय इतरांशी ही व्यवस्थित वागण्याचा सल्ला दिला. त्यानंतर सगळे स्पर्धक जान्हवीच्या नवऱ्याला भेटू लागले. तेव्हा पॅडी भाऊंना बघून जान्हवीच्या नवऱ्याने त्यांना मिठी मारली आणि त्यांची माफी मागितलेली पाहायला मिळाली. जान्हवीकडून चुका झाल्या आहेत त्यामुळे मी माफी मागतो असं म्हणत त्यानं माफी मागितली.
मात्र यावर पॅडीने समजून घेत म्हटलं की, त्या वेळेला त्या घटना घडत गेल्या मात्र मी वेळोवेळी जान्हवीला समजावले आणि तिने शांतपणे सगळं काही समजूनही घेतलं आहे, हे ऐकल्यावर जान्हवी आणि तिचा नवरा किरण किल्लेकरच्या जीवात जीव आलेला पाहायला मिळाला. जान्हवीने रागाच्या भागात पॅडी दादा आयुष्यभर अशी ओव्हर अॅक्टिंग करुन थकले आहेत असं म्हटलं यामुळे तिला सगळ्यांनी बोल लगावले.