नव्वदच्या दशकामध्ये सोनाली बेंद्रे ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. १९९४ साली तिने ‘आग’ या चित्रपटातून तिने मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं. अभिनय व सौंदर्याने तिने मनोरंजन क्षेत्रात आपली वेगळी जागा निर्माण केली. नंतर अनेक चित्रपटांमध्ये ती दिसून आली होती. तिच्या सौंदर्याचे खूप चाहते आहेत. तिच्या सौंदर्यावर भारतातच नाही तर भारताबाहेरही चाहते आहेत. त्यामध्ये पाकिस्तानी खेळाडूचाही समावेश आहे. पाकिस्तानचा प्रसिद्ध क्रिकेटपटू शोएब अख्तर सोनालीच्या प्रेमामध्ये खूप वेडा होता. त्याने सोनालीबद्दल एक विधान केले होते ज्यामुळे तो अधिक चर्चेत आला होता. (shoaib akhtar on sonali bendre)
‘हम साथ साथ है’, ‘दिलजले’, ‘सरफरोश’, ‘मेजर साब’ या चित्रपटामध्ये तिने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तिच्या अभिनयाने तिने आपली वेगळी जागा निर्माण केली. त्यावेळी पाकिस्तानी क्रिकेटर शोएबदेखील तिच्या सौंदर्याचा मोठा चाहता होता. याबद्दल त्याने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, “सोनाली मला खूप आवडते. ती मला इतकी आवडते की मला तिच्याबरोबर लग्न करण्याची इच्छा आहे”. तसेच तो पुढे मस्करीत म्हणाला की, “जर तिने माझ्याबरोबर लग्न करण्यास नकार दिला तर मी तिचे अपहरण करेन”.
यावर आता बऱ्याच वर्षांनी सोनालीने प्रतिक्रिया दिली आहे. मुलाखतीदरम्यान ती म्हणाली की, “यामध्ये किती खरं व किती खोटं हे मला सांगता येणार नाही. त्यावेळी अनेक चुकीच्या बातम्यादेखील समोर येत होत्या. पण लोकांनी माझ्यावर इतके प्रेम केले त्याबद्दल मी सर्वांचेच आभार मानेन”.
आणखी वाचा – दीपिका कक्कर सासूसाठी झाली भावूक, टीकाकारांना उत्तर देत म्हणाली, “कोणाच्याही आईबद्दल…”
तसेच पुढे ती म्हणाली की, “मला क्रिकेट इतके आवडत नाही. पण माझे पती गोल्डी व मुलांना क्रिकेट अधिक आवडते. तसेच स्टेडियममध्ये जाऊन मॅच बघायलादेखील अजिबात आवडत नाही. तिथला गोंधळ मला आवडत नाही. त्यामुळे तिथे जाऊन मंच बघणे मी पसंत करत नाही”.
सोनालीच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर ‘द ब्रोकन न्यूज’च्या दुसऱ्या सीझनसाठी ती चर्चेत आली आहे. या सिरिजचे दिग्दर्शन विनय वायकुळ यांनी केले असून तिच्याबरोबर जयदीप अहलावत व श्रीया पिळगावकर हेदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.