रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“पाळीच्या काळात…”, मासिक पाळीदरम्यान शूटिंग करण्याबद्दल हिना खानचे वक्तव्य चर्चेत, म्हणाली, “पोट दुखणं, रक्तदाब कमी होणं…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 15, 2024 | 6:42 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
hina khan on periods

"पाळीच्या काळात…", मासिक पाळीदरम्यान शूटिंग करण्याबद्दल हिना खानचे वक्तव्य चर्चेत, म्हणाली, "पोट दुखणं, रक्तदाब कमी होणं…"

ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेच्या माध्यमातून अक्षरा म्हणजेच हिना खान ही खूप चर्चेत आली. हिनाने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच अनेक वेबसिरिजमध्येही तिने महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. ‘कसोटी जिंदगी की २’ या मालिकेमध्येही ‘कोमोलिका’ ही भूमिका साकारली होती. पहिल्यांदाच नकारात्मक भूमिकेमध्ये दिसल्याने प्रेक्षकांनी खूप पसंतीही दर्शवली होती. सोशल मीडियावरदेखील तिला खूप लोकप्रियता मिळाली आहे. (hina khan on periods)

सध्या हिना तिचा पहिला पंजाबी चित्रपट ‘शिंदा शिंदा नो पापा’मुळे खूप चर्चेत आली आहे. तिने या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच पंजाबी मनोरंजन क्षेत्रांमध्ये पाऊल ठेवले आहे. सोशल मीडियावरील तिच्या अनेक फोटो व व्हिडीओची चर्चा होताना दिसते. हिनाने नुकतेच मासिक पाळीबद्दल भाष्य केले आहे. तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर मासिक पाळीसंदर्भातील एक पोस्ट केली असून ती सध्या खूप चर्चेत आली आहे. तिने मासिक पाळीबद्दल पोस्ट करत लिहिले की, “जर पाळीच्या दोन दिवस आधी दोन दिवस चित्रीकरण करण्याचा पर्याय हवा होता. असे असते तर खूप बरे झाले असते”.

आणखी वाचा – नेत्राने कोंडून ठेवल्यानंतर नागाने येऊन रुपालीची केली सुटका, विरोचकाची शक्ती आणखी वाढणार, देवीआई मदत करणार का?

पुढे तिने लिहिले की, “पाळीच्या काळात आमच्यामध्ये काम करण्याची ताकद नसते. ४० अंश सेल्सिअस तापमानात चित्रकरण करावे लागते. पोट दुखणं, मूड बदलणे, डिहायड्रेशन, गरमी, अस्वस्थता, रक्तदाब कमी होणं, अशा परिस्थितिमध्ये चित्रकरण करणं खूप कठीण असतं”.

आणखी वाचा – नेत्राने कोंडून ठेवल्यानंतर नागाने येऊन रुपालीची केली सुटका, विरोचकाची शक्ती आणखी वाढणार, देवीआई मदत करणार का?

 हिनाआधी बऱ्याच अभिनेत्रीनी मासिक पाळीदरम्यान काम करण्याबद्दल भाष्य केले होते. करीना कपूरने देखील नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितले की, “अनेक महिलांना या दिवसांमध्ये खूप त्रास होतो. अशावेळी त्यांनी किती आराम करावा हे देखील महत्त्वाचं असतं”.  

दरम्यान हिनाच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, ती आता पंजाबी अभिनेता व गायक गिप्पी गरेवालबरोबर ‘शिंदा शिंदा नो पापा’ या चित्रपटामध्ये काम करताना दिसत आहे. याआधी ती ‘बिग बॉस’ मध्येही दिसून आली होती. या कार्यक्रमामुळे तिला अधिक लोकप्रियता मिळाली होती.   

Tags: big bosshina khantelevision actress
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Rakhi Sawant's Ex-husband Ritesh Kumar give her health update see the details

“प्रकृती अजूनही गंभीर…”, राखी सावंतच्या तब्येतीबद्दल पूर्वाश्रमीचा पती रितेश कुमारने दिली प्रतिक्रिया, म्हणाला, “अँजिओग्राफीची तयारी…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.