‘बिग बॉस मराठी’च्या घरात आता स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस मराठी’चा सातवा आठवडा सुरु झाला असून आता स्पर्धकांमध्ये राडे होताना पाहायला मिळत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या भागात निक्की तांबोळी व आर्या जाधवमध्ये टोकाचं भांडण झालं. आणि रागाच्या भरात आर्याने निक्कीच्या कानशिलात लगावली. यानंतर ‘बिग बॉस’च्या घरात जान्हवी व निक्कीमध्येही वाद झालेला पाहायला मिळाला. दोघीही समोरासमोर येत एकमेकींना भिडलेल्या दिसल्या. (Bigg Boss Marathi Season 5)
कॅप्टन्सी टास्कमधून अरबाजला बाद केल्यामुळे निक्की प्रचंड संतापलेली असते. यावरुनच आता निक्कीचा जान्हवीशी वाद झाला आहे. या भांडणांदरम्यान जान्हवी निक्कीला खुलं आव्हान देताना दिसली. ती म्हणते, “तुझ्यात दम असेल, तर मला बाहेर काढून दाखव. चॅलेंज आहे माझं तुला. मराठी जनता तुला ओळखत नव्हती, म्हणून तू आलीस शोमध्ये. सगळ्यांसाठी तू या घरामध्ये घाण झाली आहेस”.
आणखी वाचा – “हिंसा निंदनीयच आहे…”, निक्कीला कानाखाली मारल्यानंतर मराठी अभिनेत्रीचा खोचक टोला, म्हणाली, “जिंकण्यासाठी…”
निक्की यावर “कॅप्टन्सीवरुन तुला काढलं ना. तुला याचा खूप राग आला आहे. तुझे गटारासारखे शब्द आहेत” अशी प्रतिक्रिया देत तिला प्रतिउत्तर दिलं. जान्हवी आता निक्कीच्या विरोधात लढताना दिसत आहे. निक्कीने इतके दिवस घरात अरेरावीची भाषा केली आणि आता ही भाषा इतरांना खटकू लागली असताना जान्हवीने निक्कीवर चढवलेला आवाज पाहून नेटकरीही तिला पाठिंबा देताना दिसत आहे. कलर्स मराठी वाहिनीवर शेअर केलेल्या या निक्की व जान्हवीच्या प्रोमोखाली नेटकऱ्यांनी कमेंट करत पाठिंबा दिला आहे.
या प्रोमोखाली नेटकरी कमेंट करत जान्हवीला पाठिंबा देत आहेत. “जानव्हीने काय खेळ केलाय यार.एका बुक्कीत टेंगुळ. अरबाजच तोंड बघण्यासारखं झाल होतं”, “आता कुठं खर खेळतेय. जान्हवी आम्ही तुला ही सपोर्ट करु. भिड तू”, “एक नंबर जान्हवी. आता खरी जान्हवी समोर येत आहे”, “बाईई. हाच तो प्रकार ज्याची वाट पहात होता अख्खा महाराष्ट्र”, “एक नंबर जान्हवी. निक्कीची अजून लायकी काढ. माजली आहे”, “अक्कल शून्य निकी आणि गुडघ्यात मेंदू असलेला अरबाज”, अशा अनेक कमेंट आलेल्या पाहायला मिळत आहेत.