‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, ब्रँड शूटसाठी आदित्य व पारू यांचं लग्न पार पडलेलं असतं. तर इकडे पारूला भास होतो की, माझं खरंच लग्न झालं आहे. आणि हे ती प्रीतम, आदित्य व दामिनी समोर कबूलही करते. शिवाय ती आदित्यला असेही म्हणते की, माझं तुमच्याशी लग्न झाला आहे त्यामुळे मी हे मंगळसूत्र जीव गेला तरी काढणार नाही. तितक्यात दामिनी तिच्यावर अरेरावी करते आणि मंगळसूत्र काढायला लावते आणि तेव्हा पारू ठिकाण्यावर येते. (Paaru Serial Update)
पारू विचार करते की, आता हे मंगळसूत्र सगळ्यांपासून लपवायला हवं, तितक्यात प्रीतम तिला बोलवायला येतो आणि पारू स्वतः जवळचा एक स्कार्फ गळाभोवती घेऊन ते मंगळसूत्र झाकून ठेवते. त्यानंतर सगळेचजण तिथून निघतात आणि घरी येतात. अहिल्यादेवी प्रीतम व आदित्यचं औक्षण करतात आणि त्यांचं कौतुक देखील करतात. तर अहिल्यादेवी पारूचं सावित्रीला औक्षण करायला सांगतात. त्यानंतर घरात जात असताना दामिनी मुद्दाम धक्का मारते आणि औक्षणाचं ताट उडून खाली पडतं त्यावर उलट दामिनी पारूवरच ओरडते आणि सांगते की जा आधी हे सर्व काही क्लीन कर. यावर अहिल्यादेवी दामिनीला ओरडतात आणि सांगतात की, ही तुझी चूक आहे त्यामुळे हे तू साफ करायचं. त्यावेळी पारू कुंकवाच्या पायांनी आत जात असताना दामिनी तिला दामिनी तिला अडवते आणि सांगते की हे तू साफ करायचे.
त्यानंतर पारू म्हणते की, ही माझी चूक आहे तर मी हे साफ करते. तुम्ही जा. यानंतर सगळेजण तिथून निघून जातात. त्यानंतर घरात बसलेले असताना अहिल्यादेवी सगळ्यांना विचारतात की, हे शूट कसं पार पडलं. यावर दामिनी खोटं खोटं नाटक करत, पारू व हरीश यांचा लग्न सोहळा अगदी थाटामाटात पार पडला आणि आपल्या क्लाइंटला सुद्धा आवडलं तसेच हे लग्न म्हणजेच चित्रपटात झालेल्या लग्नासारखाच होत असं मला भासलं असं सांगते. त्यानंतर प्रीतमही सर्व काही नीट झाल्याचं सांगतो आणि अहिल्यादेवी प्रीतमचं कौतुक करतात की, तुझं हे पहिलंच काम होतं आणि तु ही पहिली जबाबदारी उत्तमरीत्या सांभाळली. त्यानंतर अहिल्यादेवी आदित्यला विचारतात की, काही प्रॉब्लेम झाला होता का?, तू मला फोन केला होतास. त्यावर आदित्य काही बोलायला जाणार इतक्यात दामिनी मध्येच बोलत विषय बदलते. त्यानंतर पारू तिथून जात असते. पारूला अहिल्यादेवी बोलावतात आणि शूटमध्ये उत्तम काम केलं त्यामुळे तिचं कौतुक करतात आणि नंतर तिला जायला सांगतात. तर आदित्यला अहिल्यादेवींना सगळं काही खरं सांगायचं असतं त्यामुळे त्याचं लक्ष नसतं.
आता मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, पारू तिच्या गळ्यातील मंगळसूत्र सगळ्यांपासून किती दिवस लपवणार आणि आदित्य हे पारू बरोबर केलेल्या ऍड शूटसाठीच्या लग्नाचा खुलासा अहिल्यादेवींसमोर कधी करणार हे सर्व पाहणं मालिकेत रंजक ठरणार आहे.