Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वात एकामागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहे. यंदाच्या या पर्वात स्पर्धक मंडळी धुमाकूळ घालताना दिसत आहेत. ‘बिग बॉस मराठी’चा हा शो भावनांचा खेळ आहे. या भावनांच्या खेळात चौथा आठवडा सुरु झाला असून सदस्यांचे खरे रंग दिसायला सुरुवात झाली आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सदस्यांनी तिन आठवड्यातच नाती निर्माण केलेली दिसली. काहींनी या घरात मैत्रीचं नातं बनवलं, तर काहींनी प्रेमाचे बंध आणत प्रेमाची नाती बनविली तर काहींनी बहीण भावाचं नातं बनवलेलं दिसलं. या पर्वातील चर्चेत असलेली बहीण भावाची जोडी म्हणजे निक्की तांबोळी व घनःश्याम दरवडे.
छोटा पुढारी व निक्कीमध्ये बहिण-भावाचं नातं निर्माण झालेलं पाहायला मिळत आहे. पण आज रक्षाबंधनाच्या दिवशीच या भावा बहिणीच्या नात्यात फूट पडलेली पाहायला मिळणार आहे. निक्की व छोटा पुढारीमध्ये मोठा वाद झाला असल्याचं समोर आलं आहे. या प्रोमोमध्ये निक्की घन:श्यामला म्हणत आहे, “तू फेक आहेस”. त्यावर घन:श्याम तिला विचारतो, “काय फेक वागलोय ते तर सांग.. तू किती आपली आहेस हे अख्ख्या जनतेला दिसतंय. मी तुला सख्ख्या बहिणीचा दर्जा दिला होता. यावर निक्की म्हणते, “नको देऊ”. त्यावर घन:श्याम म्हणतो, “निक्की ताई बोलल्यामुळेच घात झालाय ना”.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi च्या घरातून निखिल दामलेपाठोपाठ योगिता चव्हाणही घराबाहेर, सदस्यांना अश्रू अनावर
निक्की तांबोळी आणि छोटा पुढारी नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहेत. आम्ही दोघे बहीण -भाऊ म्हणत छोट्या पुढारीने निक्कीसह मैत्री केली. पण दोघांच्या पप्पी व झप्पीमुळे प्रेक्षकांनी त्यांची खिल्ली उडवली. आता ऐन रक्षाबंधनच्या दिवशीच त्यांच्यात मोठा वाद झालेला पाहायला मिळाल्याने त्यांच्यात वाद झाल्याचं दिसत आहे. छोटा पुढारीने टीम एमध्ये जाणं पसंत केलं. निक्की, अरबाज, वैभव यांमध्ये छोटा पुढारी चांगलाच रुळला.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi मधील निखिल दामलेचा प्रवास संपला, नेमकं काय चुकलं?
सुरुवातीला निक्कीच्या अरबाज बरोबरच्या तिच्या वागणुकीमुळे त्यांच्यात प्रेमाचे बंध फुलताना पाहायला मिळाले. मात्र अरबाज बरोबर खटकल्यानंतर आता निक्कीने घनःश्याम बरोबर मैत्री केली असल्याचे पाहायला मिळालं होतं. निक्की व घनश्याम हे एकत्रच असायचे आणि बरेचदा ते एकत्र वेळही घालवताना दिसले आहेत. आता मात्र या दोघांमध्ये फाटाफूट झालेली पाहायला मिळत आहे.