गायक-संगीतकार मिका सिंगने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू आणि तिचा पती करण सिंह ग्रोवर यांच्याबरोबर काम करतानाचा अनुभव सांगितला आहे. मिकाने २०२० मध्ये निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं आणि त्यानंतर त्याने दिग्दर्शक विक्रम भट्ट यांच्या ‘डेंजरस’ या सीरिजची निर्मिती केली. यामध्ये बिपाशा आणि करण यांच्या मुख्य भूमिक होत्या. त्यांच्याबरोबर काम करताना अत्यंत नकारात्मक अनुभव आल्याचा खुलासा मिकाने एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. गायक मिका सिंहची अनेक गाणी लोकप्रिय झाली आहेत. २०२० साली त्याने ‘डेंजरस’ या सीरिजची निर्मिती केली होती. हा त्याचा पहिलाच प्रोजेक्ट होता. (mika singh on bipasha basu and karan singh grover)
‘राज’चे दिग्दर्शक विक्रम भट्ट यांच्याबरोबर मिळून त्याला काम करायचं होतं. मात्र नंतर हा प्रोजेक्ट त्याच्यासाठी एक वाईट स्वप्नच बनून राहिला. पॉडकास्ट ‘कडक’वर बोलताना मिका सिंग म्हणाला, “डेंजरस मध्ये मेकर्सने करणसिंह ग्रोवरला घेतलं होतं. पण माझं म्हणणं होतं की, बजेट पाहता आपण नवीन चेहरा घेतला पाहिजे. मला अभिनेत्रीही नवीच हवी होती. मात्र बिपाशाने यात उडी घेतली. ती म्हणाली आम्ही दोघंही या सीरिजचा भाग बनू. ते बजेटमध्ये तर आले पण त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव खूपच बेकार होता”.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा राहत्या घरात संशयास्पद मृत्यू, बेडरुममध्ये आढळला मृतदेह, नेमकं असं काय झालं?
यापुढे तो पुढे म्हणाला, “दोघांनी शूटिंगवेळी अनेक अडचणी आणल्या. त्यांच्यासाठी शूटिंग शेड्युलही पुढे ढकलण्यात आलं. मी ५० लोकांच्या टीमला घेऊन एक महिन्यासाठी लंडनला गेलो होतो. करण-बिपाशा विवाहित असल्याने मी दोघांसाठी एकच खोली बुक केली होती. पण त्यांनी वेगवेगळ्या खोलीची मागणी केली. मला तर हे समजलंच नाही. नंतर त्यांनी हॉटेलही बदलायला सांगितलं. आम्ही तेही केलं. सीन शूट करतानाही दोघं नखरे करायचे. स्टंट सीन शूट करताना करणचा पाय फॅक्चर झाला. डबिंगच्या वेळेसही त्याने नखरे दाखवले. दोघंही कारणं देत होते”.
यापुढे मिका असं म्हणाला की, “स्टंट सीन आला तेव्हा करणचा पाय फ्रॅक्चर झाला. शूट पुन्हा थांबले. या छोट्या गोष्टी होत्या ज्यांनी मोठा प्रभाव पाडला. त्यानंतर मी कोणत्याही चित्रपटाची निर्मिती करणार नाही असे म्हणत कानाला खडा लावला”. दरम्यान, गायकाच्या म्हणण्यानुसार, तेथे जे काही घडले, त्यानंतर त्याने ठरवले की तो पुन्हा कधीही कोणत्याही चित्रपटाची निर्मिती करणार नाही.