शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पारुच्या हातात येणार आदित्य आणि अनुष्काची लग्नपत्रिका, मालिकेत नवा ट्विस्ट, नक्की काय होणार?

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 29, 2024 | 5:24 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Paaru serial update twist that Aditya and Anushka will get married soon promo viral

पारू मालिकेत आदित्य व अनुष्का यांचे लग्न होणार? नवीन प्रोमोने वेधलं लक्ष

‘पारू’ या मालिकेतील आदित्य-पारूची मैत्री तर प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरल्याचे दिसते आहे. प्रत्येक वेळी आदित्यवर आलेल्या संकटातून पारू त्याला बाहेर काढताना दिसते आणि आदित्यदेखील पारूला वेळोवेळी मदत करताना दिसतो. अशातच आता दोघांच्या नात्याला नवं वळण येणार आहे. मालिकेत एकामागून एक नवीन वळण येतच असतात. अशातच आणखी एक नवं वळण आलं आहे ते म्हणजे आदित्य व अनुष्का यांच्या लग्नाचे.  मालिकेत लवकरच आदित्य व अनुष्का यांचे लग्न होतानाचे पाहायला मिळणार आहे. (Paaru serial update)

मालिकेच्या या नवीन ट्विस्टचा प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे आता मालिकेत पुढे काय होणार याची उत्सुकता वाढली आहे. झी मराठीने ‘पारू’ मालिकेच्या नुकत्याच सहर केलेल्या नवीन प्रोमोमध्ये पारू आदित्य व अनुष्का यांच्या लग्नाची पत्रिका वाचतानाचे पाहायला मिळत आहे. या नवीन प्रोमोमध्ये अहिल्यादेवी, आदित्य व अनुष्का एका देवळात असल्याचे पाहायला मिळत आहे. नंतर पारूही येते. तेव्हा अहिल्यादेवी पारूला एक छोटी पेटी देतात आणि त्यातील एक गोष्ट काढायला सांगतात. ही गोष्ट म्हणजे आदित्य-अनुष्का यांची लग्नपत्रिका.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – “स्वतःची पोळी भाजण्यासाठी…”, प्राजक्ता माळी प्रकरणाचा कुशल बद्रिकेकडून जाहीर निषेध, म्हणाला, “चारित्र्याचा खून…”

ही लग्नपत्रिका अहिलयदेवी पारूला वाचायला सांगतात. त्यानंतर पारू “श्रीकृपेने आमचा चिरंजीव आदित्य व चि.सौ.का. अनुष्का यांचा शुभविवाह” असं म्हणत ती लग्नपत्रिका वाचते. यादरम्यान सर्वांचे लक्ष पारूच्या वाचण्याकडे लागून् राहिलेले असते. पत्रिकेतील आदित्य व अनुष्का यांच्या नावामुळे सर्वानाच मोठा धक्का बसतो. अगदी पारू व आदित्यलाही. मालिकेत नुकतंच आदित्यने पारूला प्रेमाची मागणी घातल्याचे पाहायला मिळाले. अशातच आता आदित्य व अनुष्का यांच्या लग्नाचा नवीन ट्विस्ट मालिकेत पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा राहत्या घरात संशयास्पद मृत्यू, बेडरुममध्ये आढळला मृतदेह, नेमकं असं काय झालं?

त्यामुळे आता पारू मालिकेत नक्की काय होणार? आदित्यचे लग्न नक्की कुणाशी होणार? पारू की अनुष्का? हे आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दरम्यान, या प्रोमोखाली प्रेक्षकांनी पारू व आदित्य यांचे लग्न व्हावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आता पारू-आदित्य यांच्या नात्याला काय वेगळं वळण येणार? ही लवकरच पाहायला मिळणार आहे. आदित्यचे अनुष्काबरोबरचे लग्न यशस्वी होणार का? की या सगळ्याला आणखी काही नवं वळण येणार?याचीही प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. 

Tags: marathi tv serialpaaru marathi serialPaaru Serial Update
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Next Post
Bollywood singer Mika Singh revealed that he had negative experience working with actress Bipasha Basu and her husband Karan Singh Grover.

वेगवेगळ्या खोल्या, शूटिंगदरम्यान नखरे अन्...; प्रसिद्ध गायकाकडून बिपाशा-करणची पोलखोल, म्हणाला, “अत्यंत खराब अनुभव...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.