Paaru Serial Update : ‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, दिशा पारू बरोबर वाईट वागत असते आणि तिच्या कानाखाली मारायला जाते इतक्यातच आदित्य तिचा हात पकडतो आणि दिशाच्या सणसणीत कानाखाली लगावतो. आदित्य विचारतो की, हे काय चालू आहे यावर दिशा सांगते की, एक नोकर ब्रँड अँबेसेडर झाली आहे. ती सुंदर नाही आहे तरीसुद्धा तिला इतका भाव मिळतोय. तिला तुम्ही लोकांनी डोक्यावर उचलून घेतलं आहे. हे चूक आहे. दिशा तिच्या मनातला पारू बद्दलचा राग सगळा काही व्यक्त करते. यावर आदित्यला कळतं की, दिशाच्या मनात नेमकं काय सुरु आहे. त्यावर आदित्य म्हणतो की, ती सुंदर आहे.
तिच्या चेहऱ्यावरची नितळता, तेज या सगळ्याचाही तू विचार कर. ती किती निर्मळ मनाची आहे याचा विचार कर. नुसतं एक मॉडेल होऊनच एक ब्रँड अँबेसिडर होऊ शकतो असं नसतं. यावर दिशा आणखीनच अरेरावीच्या तोरात पारूला नको नको ते बोलते आणि आदित्य तिला त्यातच चॅलेंज करुन जातो. इतकंच असेल तर तू पारू सारखा होऊन दाखव आणि पारु तुझ्यासारख होऊन दाखवेल. या स्पर्धेत जो खरा विजेता असेल तो या किर्लोस्कर कंपनीचा खरा चेहरा असेल. हे ऐकल्यावर दिशा शांत होते आणि दिशा तिथून निघून जाते. तर आदित्य फार रागात असतो. दिशा तिकडून आल्यानंतर दामिनीला सांगते की, आता काही करुन मला स्वतःला सिद्ध करावंच लागेल आणि दिशा फोन करुन सर्वात महागडे हेअर ड्रेसर, मेकअप आर्टिस्ट यांना बोलावून घेते. तर इकडे अहिल्यादेवी व श्रीकांत प्रीतमच्या प्रेझेंटेशनबद्दल खूप कौतुक करत असतात.
शिवाय त्या प्रियाचे कौतुक करतात तर प्रिया देखील प्रीतम सरांच भरभरून कौतुक करते आणि सांगते की, तुमच्या दोघातले गुण हे प्रीतम सर व आदित्य सरांमध्ये आले आहेत. त्यामुळे त्यांची वागणूक ही अगदी तशीच आहे हे ऐकून सगळेच खूप खुश होतात. त्यानंतर सगळे घरी यायला निघतात. तर इकडे आदित्य खूप रागात असतो तेव्हा पारू त्याला भेटायला जाते. पारू त्याला भेटायला जाते तेव्हा आदित्य सांगतो की, हे तुला माझ्यासाठी करावंच लागेल. तुला माझ्यासाठी ही स्पर्धा जिंकावीच लागेल. तिने तुझ्या देवी आईच्या निर्णयावर शंका घेतली आहे त्यामुळे तुला हे सिद्ध करावेच लागेल. यावर पारू म्हणते की, मी तुमच्यासाठी काहीही करायला तयार आहे आणि अशा रीतीने पारू देखील स्पर्धेला तयार होते. त्यानंतर अहिल्यादेवी आणि सगळेजण आलेले असतात. तेव्हा मेकअप आर्टिस्ट, हेअर स्टाईलिस्ट खाली बसलेले असतात. त्यांना प्रीतम विचारतो इथे तुम्ही इथे काय करताय. यावर ते सांगतात की, आम्हाला दिशा मॅडमने इथे बोलावले आहे. तितक्यातच दामिनी तिथे येते आणि त्या सगळ्यांना वर घेऊन जाते. तर आदित्य त्याच वेळेला खाली येतो आणि सांगतो की, आई तू आता मला एकही प्रश्न विचारू नको. आता आपल्या घरात स्पर्धा होणार आहेत. दिशा आणि पारूमध्ये जो कोणी जिंकेल तो खरा ब्रँड अँबेसेडर असेल हे ऐकल्यावर अहिल्या देवींना राग येतो. अहिल्या देवी सांगतात, हा निर्णय तू एकट्याने कसा घेतला.
यावर आदित्य सांगतो की, आई तू माझ्यावर विश्वास ठेव काहीतरी विचार करूनच मी हे सगळं करतो आहे. हे ऐकल्यावर अहिल्यादेवी शांत होतात आणि जे काय सुरु आहे ते चालू देतात. तर प्रियाला प्रीतम व आदित्य सांगतात की तू जाऊन पारुला तयार कर. त्यावेळेला प्रीतमला आदित्य सगळं काही खर सांगतो. तोही मग दिशावर चिडचिड करु लागतो. त्यानंतर आदित्य पारुसाठी काही ड्रेस ऑर्डर करतो आणि ते घेऊन येतो. आता मालिकेच्या पुढील भागात ही स्पर्धा कोण जिंकणार?, या स्पर्धेत कोण विजयी होणार, हे सर्व पाहणं रंजक ठरेल.