Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात कधी भांडण तर कधी प्रेम फुलताना पाहायला मिळतंय. ‘बिग बॉस मराठी’चे हे नवं पर्व सुरु झालं असल्यापासूनच स्पर्धकांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतोय. प्रत्येकजण स्वतःला सिद्ध करण्यासाठी ही चुरशीची लढत लढताना दिसतात. ‘बिग बॉस मराठी सीजन ५’ च्या या नव्या पर्वात निक्की तांबोळी या स्पर्धकांना अगदी पहिल्या दिवसापासून धुमाकूळ घालताना दिसत आहे. सततचे वाद, भांडण पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोलही केलेले पाहायला मिळालं. इतकंच नव्हे तर कलाकार मंडळी ही निक्कीवर आक्षेप घेताना दिसले.
स्पर्धकांबरोबरच तिचं वागणं, बोलणं हे खटकत असल्याच म्हणत अनेकांनी तिला ट्रोल केलं. अशातच निक्की वादाबरोबरच प्रेमाच्या भोवऱ्यातही अडकलेली पाहायला मिळाली. सुरुवातीला अरबाज बरोबरच्या तिच्या वागणुकीमुळे त्यांच्यात प्रेमाचे बंध फुलताना पाहायला मिळाले. मात्र अरबाज बरोबर खटकल्यानंतर आता निक्कीने घनश्याम बरोबर मैत्री केली असल्याचे पाहायला मिळत आहे. निक्की व घनश्याम हे एकत्रच असतात आणि बरेचदा ते एकत्र वेळही घालवताना दिसतात.
अशातच आता नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये असं पाहायला मिळालं की, घनश्याम हा निक्कीचे हिल्स घालून कॅटवॉक करताना दिसत आहे. हे पाहून घरातील इतर सदस्य ही हसू लागलेत. घरातील इतर सदस्यांनाही हसू अनावर झालेला पाहायला मिळालं. नंतर निक्कीच्या हिल्स घालून पुढारी कॅटवॉक करताना दिसला. त्यानंतर घरातील इतर सदस्य निक्की व घन:श्यामच्या मैत्रीबद्दल चर्चा करतात. जवळपास त्यांची खिल्लीच उडवली जाते.
अंकिता म्हणते की, “ज्या जागी काही दिवसांपूर्वी अरबाज होता तिथे आता घन:श्याम आहे”. त्यावर पॅडी-योगिता सर्वच जण हसू लागतात. हे ‘बहीण भावाच्या नात्याला कलंक’ आहेत” असंही अंकिता म्हणाली. सर्वजण या मैत्रीबद्दल काहीतरी गॉसिपही करतात. आता येणाऱ्या भागात टीम ए मधील निक्की, अरबाज, निखिल, योगिता, घन:श्याम, सूरज आणि जान्हवी हे सातही सदस्य यानंतर कॅप्टन पदासाठी उमेदवार ठरतात.