पारू मालिकेत सध्या एकामागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेच्या नुकत्याच समोर आलेल्या भागात असं पाहायला मिळणार आहे की, किर्लोस्कर मेन्शनमध्ये प्रीतम व दिशाच्या साखरपुड्याची जोरदार तयारी सुरु असते. प्रीतम साखरपुड्यासाठी तयार नसतो तर एकीकडे आदित्यने अगदी काटेकोरपणे प्रीतमच्या साखरपुड्यासाठी सर्व योजना आखलेल्या असतात. प्रीतम या सर्वांसाठी तयार नसतो ही गोष्ट अहिल्यादेवींच्या लक्षात येते तेव्हा अहिल्यादेवी स्वतः प्रीतमला भेटायला जातात आणि त्या प्रीतमला समजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्याला समजावूनही सांगतात. (Paaru serial update)
प्रीतम त्याच्या आईच्या शब्दाबाहेर नसल्यामुळे त्यावेळी तो काहीच बोलत नाही आणि तो त्याच्या आईचं ऐकून साखरपुड्यासाठी तयार होतो. तर एकीकडे पारू ही पुन्हा एकदा मोठ्या संकटातून सावरत कामाला लागलेली असते. दिशाच कुटुंब किर्लोस्कर मेन्शनमध्ये पोहोचलेलं असतं तेव्हा आदित्य व त्याचे वडील त्यांची भेट घेत त्यांचं स्वागत करतात. तेव्हा दिशाचे वडील आदित्यला मुद्दाम विचारतात की, आता प्रीतम मागोमाग तुझही लग्न करून टाक. तुझ्या मनात कोणी असेल तर आम्हाला तू सांगू शकतोस असं ते म्हणतात.
यावर आदित्य हसत म्हणतो, माझं जे काही आहे ते माझी आई ठरवेल. तितक्यात पुन्हा दिशाचे वडील आदित्यला म्हणतात की, तुझ्या मनात असेल कोणाचं नाव तर सांग लाजू नकोस. इतक्यात आदित्यचे वडील पारूला आवाज देतात, हे बघून आदित्य चक्रावतो. तेव्हा ते म्हणतात, पारू इकडे ये. त्यानंतर ते पारूला सांगतात की, इव्हेंट कंपनीची एवढी माणसं कामाला असताना तू का काम करते?, यावर पारू म्हणते, प्रीतम सरांचं लग्न आहे आपल्या घरचेच लग्न आहे मग हे काम नाही ही आमची जबाबदारी आहे, असं म्हणून ती तिथून निघून जाते. त्यांनतर आदित्यचे बाबा तिची स्तुती करतात.
त्यानंतर दामिनी पारुला पकडते आणि दिशाचा बदला पारूच्या मार्फत घेण्याचा कट रचते. दामिनीला अहिल्यादेवींनी प्रीतम व दिशाच्या साखरपुड्याच्या अंगठीची जबाबदारी दिलेली असते. मात्र दामिनी त्या अंगठीचा डब्बा पारूच्या हातात सोपावते आणि सांगते की, साखरपुड्यासाठीची ही किर्लोस्कर कुटुंबाची जी अंगठी आहे ती तू सांभाळून ठेव. आता ही मोठी जबाबदारी तू सांभाळ असं म्हणून ती तिथून निघून जाते. आता पारू ती अंगठी सांभाळून ठेवणार का?, पारूच्या हातून काही चूक घडून दिशा व प्रीतमच्या साखरपुड्यामध्ये अडथळा येणार का?, की प्रीतम दिशाबरोबर साखरपुडा करण्यास नकार देणार, हे सर्व पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.