मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

काम बघून नव्हे तर ज्योतिषीमुळे स्मृती ईराणींना मिळाली होती तुलसीची भूमिका, एकता कपूरने नाकारलं सत्य, म्हणाली, “हे खोटं आहे कारण…”

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 17, 2024 | 8:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
smirti irani on kyonki saas bhi kabhi bahu thi

काम बघून नव्हे तर ज्योतिषीमुळे स्मृती ईराणींना मिळाली होती तुलसीची भूमिका, एकता कपूरने नाकारलं सत्य, म्हणाली, "हे खोटं आहे कारण…"

टेलिव्हिजनवर २००२ साली सुरु झालेली ‘क्योकी सास भी कभी बहु थी’ ही मालिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या मालिकेतील तुलसी ही भूमिका सगळ्यांची लोकप्रिय भूमिका होती. ही भूमिका अभिनेत्री स्मृती इराणी यांनी साकारली आहे. या भूमिकेला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. विशेषतः महिलांमध्ये ही भूमिका अतिशय गाजली होती. सालस सून व घराची काळजी घेणारी सून कशी असावी यासाठी मालिकेतील तुलसीचे उदाहरण दिले जात असे. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माती एकता कपूरने या मालिकेची निर्मिती केली होती. फार पूर्वीपासूनच एकता व स्मृती यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. पण स्मृती यांना ही भूमिका कशी मिळाली याबद्दल यांनी स्वतः खुलासा केला आहे. (smirti irani on kyonki saas bhi kabhi bahu thi)

‘क्योकी सास…’ या मालिकेतील तुलसीची भूमिका कशी मिळाली हे स्वतः स्मृती यांनी सांगितलं आहे. सुरुवातीपासूनच दोघींचे मैत्रीपूर्ण संबंध होते. पण ही भूमिका मिळण्यामागे जोतिषांचा हात होता हे त्यांनी सांगितले. याबद्दल त्या म्हणाल्या की, “माझ्या दिसण्यामुळे किंवा माझ्या व्यक्तीमत्त्वामुळे मला ही मालिका मिळाली नव्हती. एकताने एकदा तिच्या ऑफिसमध्ये ज्योतिषांना बोलावले होते. त्यांनी मला लांबूनच पाहिले आणि थांबण्यास सांगितले. त्यांनी मला तिथे सांगितले की मी मोठी स्टार होणार आहे”.

आणखी वाचा- सुप्रसिद्ध अभिनेत्री शूटिंगला असताना घरी बाळ बेडवरुन खाली पडलं अन्…; स्वतःच सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “देवाच्या कृपेने…”

View this post on Instagram

A post shared by Curly Tales | A Fork Media Group Co. (@curly.tales)

पुढे त्यांनी सांगितले की, “मी एकदा कॉन्ट्रॅक्ट सही करण्यासाठी गेले होते ज्यामध्ये मला बहिणीची भूमिका मिळणार होती. तिथे एकता एका पंडितांबरोबर बसली होती. त्यांनी एकताला सांगितले की जर तिने माझ्याबरोबर काम केले तर देशाचा एक मोठा चेहरा होणार आहे. तसेच त्यांनी त्यांचे वाक्य संपवले एकताने लगेचच माझ्याकडे आली आणि मला विचारले की कशावर सही करत आहेस? तिने नंतर मला तिच्या मालिकेत काम करण्याची ऑफर दिली. मी ती लगेच स्वीकारली आणि नंतर तुलसी म्हणून सगळ्यांच्या समोर आले”.

आणखी वाचा- “देवाच्या गाण्याची वाट कशाला लावता?”, अमृता फडणवीस यांचं ‘हे राम’ गाणं ऐकून भडकले प्रेक्षक, म्हणाले, “आमच्यावर दया करा”

तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. एकताने हा व्हिडीओ रिशेअर करत लिहिले की, “हे खरं नाही आहे. मोनिषाने तुमची ऑडिशन घेतली होती. आम्ही ती पहिली आणि मग तुमची निवड केली”.

दरम्यान एकताच्या या प्रतिक्रियेमुळे मनोरंजन क्षेत्रांमध्ये खूप चर्चा सुरु झाली. स्मृती इराणी सध्या अभिनयापासून दूर असून राजकारणामध्ये सक्रिय आहेत.  त्या आता महिला व बालकल्याण विकास मंत्री म्हणून कार्यरत आहेत.

Tags: ekta kapoorKyoki Saas Bhi Kabhi Bahu Thi Famesmiti irani
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
Paaru serial update

साखरपुड्याच्या अंगठीची पारूवर मोठी जबाबदारी, प्रीतम दिशाच्या साखरपुड्यात येणार का अडथळा?, काय घडणार?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.