बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पारूने हरिशबरोबर लग्नाला दिला नकार, अहिल्यादेवींचा शब्द मोडणार का?, तर दिशाने भरले दामिनीचे कान

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 8, 2024 | 9:35 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Paaru Serial Update

पारूने हरिशबरोबर लग्नाला दिला नकार, अहिल्यादेवींचा शब्द मोडणार का?, तर दिशाने भरले दामिनीचे कान

‘पारू’ या मालिकेत एक नवीन ट्विस्ट आलेला पाहायला मिळत आहे. मालिकेत असं पाहायला मिळतं आहे की, अहिल्यादेवींनी पारुला शिक्षा सुनावलेली असते की आठ दिवस तू किर्लोस्कर वाड्यात पाऊलसुद्धा ठेवायचं नाही. तर दामिनीला शिक्षा सुनावलेली असते की, जेवढे दिवस पारू इथे नाही आहे तेवढे दिवस पारूची सर्व काम करायची हे ऐकून दामिनीचा पारा चढलेला असतो. त्यानंतर दामिनी सकाळी उठते आणि कॉफी दिली नाही म्हणून किचनमध्ये तावा तावात जात सावित्रीला जाब विचारते. तेव्हा सावित्री सांगते की, अहिल्या मॅडमने तुम्हाला कॉफी घेऊन बोलावलं आहे हे ऐकल्यावर तर दामिनीचा अजूनच संताप होतो. (Paaru Serial Update)

त्यानंतर दामिनी म्हणते दे कॉफी मी नेऊन देते. तेव्हा सावित्री तिला नोकरांनी नेसायची साडी देते आणि सांगते की, ही साडी नेसूनच तुम्हाला आजपासून आठ दिवस काम करायचं आहे. हे ऐकल्यावर दामिनी म्हणते की, तू मला ऑर्डर सोडू नकोस आणि आता तुझे दिवस चांगले आहेत उद्या माझे चांगले येतील तेव्हा मी तुला बघूनच घेईल असं म्हणत साडी घेऊन जाते. त्यानंतर इकडे अहिल्यादेवी, प्रीतम, त्याचा काका, त्याचे बाबा सगळेजण बसलेले असतात. तेव्हा दामिनी अहिल्यादेवींना नोकरांची साडी नेसून कॉफी घेऊन येते आणि म्हणते की, मॅडम कॉफी आणली आहे. तेव्हा त्या कॉफी बाजूला ठेवायला सांगतात. दामिनीचं हे रूप पाहून तिच्या नवऱ्याला आणि प्रीतमला भरपूर हसू येत तर अहिल्यादेवींना सुद्धा हसायला येतं. तितक्यात दामिनीचा धक्का दिशाला लागतो पण दिशा दामिनीला ओळखतच नाही.

आणखी वाचा – अधिपतीचा संसार मोडण्यासाठी भुवनेश्वरीने गाणं शिकवणाऱ्या मुलीला दिले पैसे, अक्षरापासून कायमचा दूर होणार का?, नवं वादळ

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

त्यामुळे दिशा दामिनीला ओरडते, तेव्हा दामिनी रागारागात तिथून निघून जाते. त्यानंतर दिशाही तिच्या मागोमाग जाते आणि सांगते की, तुझ्यावर ही वेळ माझ्यामुळे नाही तर पारूमुळे आलेली आहे. असं म्हणत पारूबद्दल दिशा दामिनीच्या मनात राग निर्माण करते. तर इकडे मारुती पारू बरोबर बोलायला जातो. पारूला तो अहिल्यादेवीने तिच्यासाठी मुलाची निवड केली असल्याचे सांगतो आणि मग तो हरीशबद्दल सांगतो. हे ऐकून पारू शांतच बसते आणि पारू शेवटी रडू लागते आणि म्हणते की, तुला मी एवढी जड झाली आहे का?, आधी इतकी वर्ष मी तुझ्यापासून लांब राहिले आणि आता मला तुझ्या जवळ राहायचे आहे तर तू मला दूर करत आहेस.

आणखी वाचा – उन्हाळ्यात त्वचेची अशी घ्या काळजी, तितीक्षा तावडेनेच सांगितल्या खास टिप्स, अभिनेत्रीसारखंच दिसाल सुंदर

मला माझ्या आईची सेवा करता नाही आली आता तरी मला तुझी आणि देवी आईची सेवा करायला मिळू दे. आता हा लग्नाचा विषय थोडे दिवस तरी नको असं म्हणत पारू लग्नाला नकार देते. आता मालिकेत दामिनी पारू विरुद्ध कोणता नवा डाव आखणार नाही ना?, पारूने लग्नाला दिलेला नकार अहिल्यादेवीपर्यंत पोहोचल्यावर अहिल्यादेवी यावर काय बोलणार हे सर्व पाहणं मालिकेत रंजक ठरेल.

Tags: marathi serialpaaru serialPaaru Serial Updatezee marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Tharal Tar Mag Serial Update

चैतन्यने कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच सत्य साक्षीला सांगितल्याचा अर्जुनसमोर केला खुलासा, सायली प्रेमात आकंठ बुडाली अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.