शुक्रवार, एप्रिल 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आदित्यबरोबरच्या लग्नाचा पारू करणार खुलासा, अहिल्यादेवी योग्य तो न्याय देणार का?, मालिकेत काय घडणार?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 1, 2024 | 9:35 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Paaru Serial Update

आदित्यबरोबरच्या लग्नाचा पारू करणार खुलासा, अहिल्यादेवी योग्य तो न्याय देणार का?, मालिकेत काय घडणार?

‘पारू’ या मालिकेच्या भागात असं पाहायला मिळत आहे की, पारू आणि मारुती बोलत असतात तेव्हा मारुती पारुला सांगतो की, मी गावात गेलो होतो तेव्हा सगळं काही व्यवस्थित दर्शन झालं मंदिरातल्या त्या गुरुजींनी मला तुझ्याबद्दल असं सांगितलं की, तुझं आज लग्न आहे त्यांचं काही मला हे पटलं नाही. हे ऐकल्यावर पारू शांतच होते. त्यानंतर पारू आशीर्वाद घ्यायला म्हणून मारुतीच्या पाया पडते तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी येतं, ते पाहून मारुती काळजीत पडतो. तेव्हा मारुती म्हणतो की, काय झालं आहे का?, यावर मारुती म्हणतो, त्या गुरुजींनी तुझं भविष्य उज्वल असल्याचेही सांगितलं आहे त्यामुळे आता काही चिंता नाही असेही तो म्हणतो. (Paaru Serial Update)

तितक्यात तिथं प्रीतम येतो आणि पारूला बोलावू लागतो. तर इकडे हरीश चक्कर येऊन पडलेला असतो. त्यामुळे काही रस्त्यावरच्या लोकांनी त्याला एका इस्पितळात ठेवलेलं असतं. पारू, आदित्य, प्रीतम मिळून हरीशला बघायला हॉस्पिटलला जातात. तर इकडे तर इकडे अहिल्यादेवींना आदित्यच्या लग्नाची चिंता लागून राहिलेली असते. पारू, आदित्य, प्रीतम हॉस्पिटलला पोहोचतात तेव्हा हरीश कडून कळतं की त्याला अचानक चक्कर आली आणि तो खाली पडला त्याआधी तो नवरा मुलगा म्हणून तयार होऊन बसला होता कोणी बोलवायला येतंय का याची वाट पाहत. हे ऐकल्यावर आदित्य त्याला विचारतो मग तू ती चिठ्ठी का लिहून ठेवलीस?, यावर हरीश सांगतो की, मी अशी कोणतीही चिठ्ठी लिहून ठेवली नाही आणि मला जेव्हा जाग आली तेव्हा मी थेट या बेडवर होतो हे ऐकल्यावर आदित्यला शंका येते की ,हे कोणीतरी मुद्दाम केलेलं आहे. त्यावर आदित्य सांगतो की, आपल्याला हे शोधून काढावंच लागेल की हे नक्की कोणी केल आहे. त्यानंतर सगळेच ₹जण पुन्हा घरी जायला निघतात.

आणखी वाचा – कर्क व कन्यासह ‘या’ राशींवर १ जून रोजी शनिदेवाची कृपा होणार, जाणून घ्या, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असणार?

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आदित्य प्रितमला हरीशची प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सोय करायला सांगतो आणि हे आपल्या चौघातच राहील असंही सांगतो. त्यानंतर घरी आल्यानंतर पारू अहिल्यादेवींना चहा घेऊन येते तेव्हा अहिल्यादेवी आदित्यच्या लग्नाबाबत श्रीकांतशी बोलत असतात. तेव्हा अहिल्यादेवी सांगतात की, माझी या किर्लोस्कर घराची थोरली सून अशी असावी जिने सगळ्या जबाबदाऱ्या पार करत आदित्यची साथ द्यायला हवी. बिजनेसमध्ये त्याला मदतीचा हात द्यायला हवा. प्रीतमला धाकट्या भावाप्रमाणे तिने सांभाळायला हवं आणि दिशाला तिने ऍडजेस्ट करुन घ्यायला हवं. अशी हवी माझी थोरली सून. असं सांगत असतानाच पारू तिथे येते. पारू तेव्हा विचार करू लागते की, अहिल्यादेवी तर त्यांच्या थोरल्या सूनेबाबत स्वप्न रंगवत आहेत तितक्यात अहिल्यादेवी पारूची विचलित स्थिती पाहतात आणि म्हणतात की, तुझं काही बिनसलं आहे का?, काही बोलायचं असेल तर बोल. यावर पारू नाही असे म्हणते आणि तिथून निघून जाते. मात्र अहिल्यादेवी ना कळत की पारूचं कालपासून काहीतरी बिनसलं आहे आणि तिला आपल्याशी काहीतरी बोलायचं आहे. तर इकडे मालिकेत असं पाहायला मिळते की, पारू अहिल्यादेवी जवळ येते तेव्हा अहिल्या देवी आराम करत असतात.

आणखी वाचा – बहीण किडनॅप झाल्यानंतर श्वेताला बेशुद्ध करुन लीलाच ऐजेबरोबर लग्नाला उभी राहणार, सूनांनाही बसला धक्का, कथेमध्ये मोठा ट्वीस्ट

पारू त्यांच्या पायाजवळ बसते आणि सांगते की मला कळतंय तुमच्या मनाची घालमेल सुरू आहे. मला थोडावेळ तुमच्याजवळ बसू द्या यावर त्या बसू देतात आणि विचारतात की जशी माझ्या मनाची घालमेल तुला कळतेय तसे तुझ्या मनातही काहीतरी सुरू आहे हे मला सुद्धा कळतंय तुला बोलायचं असेल तर तू बोल यावर पारू बोलते की, काल सगळं लग्न व्यवस्थित पार पडलं मात्र नेमकं लग्नाच्या वेळी असं बोलत असतानाच मालिका संपते. आता मालिकेच्या पुढील भागात पारू अहिल्यादेवी समोर आदित्य व तिच्या लग्नाचा खुलासा करणार का?, अहिल्यादेवी या सगळ्याला कसा न्याय देणार हे सर्व पाहणं मालिकेत रंजक ठरेल.

Tags: marathi serialpaaru serialPaaru Serial Updatezee marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

kashmira kulkarni injured leg
Entertainment

पायाला दुखापत, शस्त्रक्रिया आणि…; ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम अभिनेत्री मालिकेतून घेणार ब्रेक?, मोठी अपडेट समोर

एप्रिल 24, 2026 | 1:55 pm
Sunita Ahuja viral video
Entertainment

गोविंदा आणि त्याच्या पत्नीमध्ये पुन्हा बिनसलं, समोर आलेल्या व्हिडीओने झालं स्पष्ट, Video व्हायरल

एप्रिल 24, 2026 | 12:55 pm
Gayatri Datar Wedding
Entertainment

मराठी अभिनेत्रीची लगीनघाई, ग्रहमखचे फोटो समोर, होणाऱ्या नवऱ्यानेही लग्नविधीचे फोटो केले शेअर

एप्रिल 24, 2026 | 11:51 am
 Kajol breaks silence on breaking no kissing policy
Entertainment

“मला अस्वस्थ वाटतं”, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने ३० वर्षांनी मोडली NO KISSING SCENE पॉलिसी, म्हणाली…

एप्रिल 24, 2026 | 10:13 am
Next Post
Tharal tar mag Serial Update

अर्जुनने पुराव्यानिशी साक्षीला खोटं सिद्ध केलं, चैतन्यचाही राग अनावर, तर सायलीचा आनंद गगनात मावेना

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.