‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, हळदीच्या दिवशी पारू किर्लोस्कर बंगल्यात येऊन काम करत असते. पारूला तिचा या घरातील शेवटचा दिवस असल्याने खूपच वाईट वाटत असतं आणि जर तिच्या आयुष्यातील जोडीदाराचे सत्य तिने हरीशला नाही सांगितलं तर ती घर सोडून जाणार असं तिनं ठामपणे विचार केलेला असतो. किर्लोस्कर कुटुंबात काम करत असताना ती मोहनसाठी चहा घेऊन त्यांच्या खोलीत येते तेव्हा दामिनी गालावर उमटलेली मेहंदी पुसण्याचा प्रयत्न करत असते. पारूला पाहून तिचा राग अनावर होतो आणि ती पारूला काहीपण बोलू लागते. (Paaru Serial Update)
तुला इथे काम करायला आवडतं की तुला मुद्दाम अहिल्या वहिनींच्या नजरेत यायचं असतं म्हणून तू हळदीच्या दिवशी ही काम करत आहेस. तुला एवढी सुद्धा अक्कल नाही का असं म्हणत पारूचा ती चांगलाच पान उतारा करते आणि तिला जायला सांगते. त्यानंतर पारू आदित्यच्या खोलीमध्ये त्याच्यासाठी कॉफी आणि जास्वंदीचं फुल घेऊन येते. तेव्हा आदित्यही पारूचा निरोप घेतो आणि तिला मिठी मारतो आणि सांगतो की, तू आयुष्यभर माझ्याबरोबर असशील अस मला वचन दे. यावर पारूदेखील मी आयुष्यभर तुमचीच असेल असे म्हणते आणि त्यानंतर पारूलाही अश्रू अनावर होतात. तेव्हा आदित्य सांगतो की तू असं का वागत आहेस जसं की तू कायमचीच निघून जाणार आहेस. यावर पारू काहीच बोलत नाही. त्यानंतर काही केल्या हरीशबरोबर आपल्याला बोलायला हवं असा विचार पारू करते आणि हरीशला ती शेवटी गाठते. हरीश सरांना सांगते की, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. यावर हरीश सर सांगतात की तुझा पूर्ण अधिकार आहे तुला जेव्हा हवं तेव्हा तू माझ्याकडे येऊ शकते. मी कितीही कामात बिझी असलो तरी मी तुझ्यासाठी नक्कीच वेळ देईन. त्यानंतर तो पारू किती निस्वार्थी आहे, किती प्रेमळ आहे याबद्दल हरीश सरांशी बोलत असते. तेव्हा पारू सांगते की, मी हे कोणत्याही बदल्यासाठी करत नाही. मला इथलं काहीच नकोय हे ऐकल्यावर हरीश तर तिच्या अजूनच प्रेमात पडतो.
पारू त्यांना काहीतरी सांगायला जाणार इतक्यात तिथे प्रीतमला शोधत दिशा येते आणि दिशा विचारते प्रीतम कुठे आहे. नंतर दिशाच्या लक्षात येतं की, हे दोघं काहीतरी बोलत होते आणि म्हणून ती त्यांची माफी मागते. तितक्यात आतून एक नोकर येतो आणि त्या तिघांना अहिल्यादेवींनी बोलावलं असं सांगतो. त्यानंतर सगळेचजण अहिल्या देवीकडे जातात. त्यावेळेला पारूचं हरीश सरांबरोबरच बोलणंही राहून जातं. अहिल्यादेवी सांगतात की, आता तुमचं लग्न होणार आहे हळद लागली की तुम्ही घराबाहेर पडू शकत नाही. त्यामुळे लग्न हळद लागायच्या आधीच तुम्ही कुलदेवतेचं दर्शन करुन यावं असं मला वाटतं. असं म्हणत असताना त्या प्रीतम व दिशाला म्हणतात की, तुमचंही आता लग्न होणार आहे त्यामुळे तुम्ही दोघेही त्यांच्याबरोबर जाऊन दर्शन करुन घ्या. तेव्हा आदित्य सांगतो मी यांची जाण्याची व्यवस्था करतो. तेव्हा अहिल्यादेवी आदित्यलाही त्यांच्याबरोबर जाण्यास सांगतात. त्याच वेळेला तिथे प्रिया येते आणि काही फुलं वगैरे लागणार असल्याचं सांगते. तेव्हा प्रीतम सांगतो की, आम्ही बाहेर जात आहोत तू सुद्धा आमच्याबरोबर चल यावर अहिल्यादेवी ही परवानगी देतात.
आता मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, आदित्य पारू व हरीश पाया पडत असतात तितक्यात हरीशला फोन येतो आणि हरीश बाहेर निघून जातो. त्यावेळेला पारू आणि आदित्य देवासमोर उभे असतात. गुरुजी पारू व आदित्यला प्रसाद देत तुमची जोडी कायम सुखी, समाधानी आणि आनंदी राहील असा आशीर्वाद त्यांना देतात. यावर दोघेही एकमेकांकडे पाहू लागतात. आता मालिकेच्या पुढील भागात काय घडणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.