सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पारू-हरीशच्या साखरपुड्यात मोठं विघ्न?, अहिल्यादेवींचा रागही अनावर, मालिकेत येणार मोठा ट्विस्ट

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 23, 2024 | 9:35 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
पारू-हरीशच्या साखरपुड्यात मोठं विघ्न?, अहिल्यादेवींचा रागही अनावर, मालिकेत येणार मोठा ट्विस्ट

पारू-हरीशच्या साखरपुड्यात मोठं विघ्न?, अहिल्यादेवींचा रागही अनावर, मालिकेत येणार मोठा ट्विस्ट

‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळणार आहे की, पारूने हरिषबरोबर लग्नास होकार दिलेला असतो. आदित्यच्या म्हणण्यानुसार पारू हरिशची परीक्षा घेते. पारू हरिषला सांगते की, तुम्ही माझ्याबरोबर लग्न करायला नकार द्या. माझी आता लग्न करायची इच्छा नाही आहे. कृपया तुम्ही स्वतः मला समजून घ्या. पारूच्या डोक्यात असं असते की, हरीशने मला नकार दिला तरच मी त्याला होकार देणार. आणि त्याने जर होकार दिला तर ती स्वतः या लग्नाला नकार देणार. तेव्हा तिथे मारुती येतो मात्र पारू मारुतीचं ही काही ऐकत नाही. त्यानंतर अहिल्यादेवी सगळ्यांच्या समोर पारूला विचारतात की, पारु तू लग्नाला तयार आहेस की नाही?, हे ऐकल्यावर पारू सुरुवातीला काहीच बोलत नाही. (Paaru Serial Update)

त्यानंतर हरीश स्वतःच म्हणतो, अहिल्या मॅडम मला काहीतरी बोलायचं आहे. मी या लग्नाला नकार देत आहे आणि मी हे लग्न करायला तयार नाही कारण माझं आणि पारूचं स्टॅंडर्ड हे एकसारख नाही आहे. पारू या घराची मोलकरीण आहे. तिचे बाबा ड्रायव्हरचं काम करतात आणि मी एका चांगल्या कंपनीत चांगल्या पोस्टवर आहे. त्याच्यामुळे मी हे लग्न नाही करू शकत. हे ऐकल्यावर देवींचा संताप होतो अहिल्यादेवी हरीशला म्हणतात तू काय बोलतो आहेस तुझ तुला कळतंय का? पारू या कंपनीची ब्रँड एमबेसिडर आहे आणि मारुती हा आमच्या घराचा एक भाग आहे. तू ड्रायव्हर आहे असं कसं म्हणू शकतो. तुझी विचार करण्याची क्षमता इतकी खालची असेल असं मला वाटलं नव्हतं. आदित्य याला आताच्या आता इथून निघून जायला सांग आणि आपल्या कंपनीत हा माणूस पुढे काम करणार नाही असं म्हणतात. त्यानंतर हरीश तिथून जायला निघतो तेव्हा आदित्य त्याला थांबवतो आणि म्हणतो की, पारू पाहिलंस का हरिश सगळं पणाला लावून बसला. त्याचं काम पैसा आणि तुला. तेव्हा सगळ्यांना कळत नाही की आदित्य नेमकं काय बोलत आहे.

आणखी वाचा – ‘आठवी-अ’ वेबसीरिज नक्की कुठे शूट होते?, कसा चित्रित केला जातो प्रत्येक सीन, पाहा Inside Video

आदित्य सगळ्यांना सांगतो पारू त्याची परीक्षा घेत होती. त्यानंतर पारू हरीशबरोबर साखरपुडा करायला तयार होते. लगेचच दुसऱ्या दिवशी साखरपुडा करायचं अहिल्यादेवी सांगतात. मात्र एका दिवसात सगळं कसं करायचं म्हणून सगळ्यांची धावपळ होते. त्यानंतर सगळेचजण कामाला लागतात. मारुतीच्या घरासमोर साखरपुडा करायचं ठरतं. सगळेजण जोरदार तयारी करत असतात तेव्हा आदित्यही सगळ्यांना मदत करत असतो तितक्यात दिशा आणि अहिल्यादेवी बाहेर जात असतात तेव्हा दिशा कीर्लोस्कर कंपनीचा सीईओ एका मेडच्या साखरपुड्याची अशी तयारी करतोय हे जर मीडियाला कळालं तर काय होईल. म्हणजे हे किती चुकीच दिसेल. यावर अहिल्यादेवी थोडा विचार करतात आणि त्यांनाही हे थोडंसं पटतं. त्यानंतर ते आदित्यला बोलावून घेतात आणि आदित्यची चांगलीच कान उघडणी करतात. त्या म्हणतात की, तू एका कंपनीचा मालक आहेस. लाखो लोक तुझ्या भरोशावर आहेत. त्याच्यामुळे तू सर्वांना समानच वागणूक दिली पाहिजे.

आणखी वाचा – सुंदर सजावट, प्रशस्त जागा अन्…; अमेरिकेत असं आहे मृणाल दुसाणीसचं घर, पाहा Inside Photos

पारू आणि मारुती तुझ्या जवळचे आहेत हे मला मान्य आहे तरीसुद्धा तू कंपनीकडे दुर्लक्ष करून या कार्यक्रमात अति सहभागी होणं फार चुकीचे आहे. ही गोष्ट आदित्यलाही पटते. त्यानंतर सगळेचजण तयार होत असतात. तयार झाल्यानंतर इकडे सगळेजण साखरपुड्याचा कार्यक्रम करायला येतात. तेव्हा पारू अहिल्यादेवींनी फेकून दिलेली साडी तिच्या या खास दिवसासाठी वापरते. हे पाहून अहिल्यादेवींना धक्का बसतो. तर श्रीकांत अहिल्यादेवींना म्हणतो तू फेकून दिलेली साडी पारुने तिच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या दिवशी नेसली आहे. यावरूनच कळतं की, तिला तुझ्याबद्दल किती आदर आणि कृतज्ञता आहे. त्यानंतर साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडणार असतो. हरीश पारूच्या हातात अंगठी घालतो आणि पारू अंगठी घालायला जाते तितक्यात ती अंगठी खाली पडते आणि घरंगळत आदित्यच्या पायाजवळ येऊन थांबते. आता मालिकेच्या आगामी भागात पारू हरीशला अंगठी घालणार का?, नक्की काय होणार हे पाहणं रंजक ठरेल.

Tags: entertainmentmarathi serialpaaru serialPaaru Serial Updatezee marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Tharal Tar Mag Serial Update

सायलीच्या घर सोडून जाण्याने अर्जुन बेचैन, दोघांमधील वादाचं कारण येणार का सुभेदार कुटुंबासमोर?, पुढे काय घडणार?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.