रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘आठवी-अ’ वेबसीरिज नक्की कुठे शूट होते?, कसा चित्रित केला जातो प्रत्येक सीन, पाहा Inside Video

Saurabh Moreby Saurabh More
मे 22, 2024 | 6:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Media One Solutions Presents Its Majja 'Aathvi-A' bts video

'आठवी-अ' वेबसीरिज नक्की कुठे शूट होते?, असा चित्रित केला जातो प्रत्येक सीन, पाहा Inside Video

अनेकदा पडद्यावर घडणाऱ्या गोष्टींपेक्षा पडद्यामागच्या काही रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी अनेक प्रेक्षक किंवा चाहते उत्सुक असतात. पडद्यावर चित्रित होणाऱ्या एखाद्या दृश्यासाठी पडद्यामागील मंडळी तंत्रज्ञ किंवा कलाकार कशी मेहनत घेतात?, यात ते कशी तयारी करतात याबद्दल अनेकांना जाणून घेण्यात रस असतो. अशातच सध्या युट्युबवर ‘इट्स मज्जा’ व ‘कोरी पाटी’ प्रॉडक्शन यांची ‘आठवी-अ’ ही सीरिज धुमाकूळ घालत आहे.

या सिरीजच्या प्रत्येक भागाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे या सीरिजच्या प्रदर्शित होणाऱ्या भागांच्या पडद्यामागे घडणाऱ्या अनेक रंजक कथा जाणून घेण्यासाठी या सीरिजचे चाहते मंडळी खूपच उत्सुक असतात. अशातच या सीरिजच्या नुकत्याच झालेल्या एका भागात विहिरीत पोहणाऱ्या मधुकर, किरण्या यांचा धम्माल परफॉर्मन्स पाहायला मिळाला आणि हा सीन शूट कसा झाला? याबद्दलचा एक BTS व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

आणखी वाचा – “उत्सुकता नाही तर तणाव वाढतो”, ‘सातव्या मुलीची…’मधील ट्वीस्ट पाहून प्रेक्षकांना राग अनावर, म्हणाले, “एवढी क्रूरता…”

‘इट्स मज्जा’च्या युट्यूब चॅनेलद्वारे हा BTS व्हिडीओ शेअर करण्यात आला असून यामध्ये कलाकारांसह तंत्रज्ञ मंडळींची मेहनत दिसून येत आहे. या BTS व्हिडीओमध्ये कलाकारांच्या पोहण्यासह त्यांचे संवाद वाचन, तसेच सीनचे सादरीकरण, त्याचा सरावही पाहायला मिळत आहे. सीरिजचे दिग्दर्शक नितीन पवार हे या सीरिजमधील कलाकरांना सीन समजावून सांगताना, तसेच त्या सीनसाठीचा सराव करून घेतानाचे काही दृश्यदेखील या BTS व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. तसेच दोन सीनमधल्या रिकाम्या वेळात सहकलाकारांबरोबरची धमाल मजामस्तीही या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनची घोषणा, कोणत्या स्पर्धकांची शोमध्ये होणार एंट्री?, प्रोमोने वेधलं लक्ष

‘आठवी-अ’ या सीरिजचे शूटिंग हे सातारामध्ये सुरू आहे आणि या मालिकेतील सगळेच कलाकार हे सातारामधील आहेत. त्यामुळे मातीशी नाळ जोडणाऱ्या कलाकारांचा सकस अभिनय व कथा अनेक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत आहे. त्यामुळे साहजिकच या सीरिजला प्रेक्षकांकडूनही तुफान प्रतिसाद मिळत असून या सीरिजच्या प्रत्येक भागाला लाखोंच्या पार व्ह्यूज मिळत आहेत. दरम्यान, ‘आठवी-अ’ या सीरिजद्वारे डोंगरावरच्या एका छोट्याश्या खेडेगावातून हायस्कुलसाठी परगावी येणाऱ्या अभिजीत व त्यांच्या खास मित्रांची साधी तरी प्रत्येकाला आपलीशी वाटणारी गोष्ट सांगण्यात आली आहे.

Tags: Aathvi-A seriesentertainment newsmarathi entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
23 may 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

व्यावसायिक व उद्योजकांसाठी गुरुवारचा दिवस आर्थिक लाभाचा, तर 'या' राशीच्या लोकांना मिळणार नवीन संधी

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.