रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुंदर सजावट, प्रशस्त जागा अन्…; अमेरिकेत असं आहे मृणाल दुसाणीसचं घर, पाहा Inside Photos

Saurabh Moreby Saurabh More
मे 22, 2024 | 4:00 pm
in Trending
Reading Time: 7 mins read
google-news
Marathi actress Mrunal Dusanis home

सुंदर सजावट, प्रशस्त जागा अन्...; अमेरिकेत असं आहे मृणाल दुसाणीसचं घर, पाहा Inside Photos

माझिया प्रियाला प्रित कळेना’, ‘मन हे बावरे’, ‘तू तिथे मी’, ‘अस्स सासर सुरेख बाई’ अशा अनेक लोकप्रिय मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मृणाल दुसानीस. तिने साकारलेली प्रत्येक भूमिका छोट्या पडदयावर प्रचंड गाजली. मालिकांमुळेच तिने स्वतःचा असा खूप मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. मात्र लग्नानंतर अभिनेत्री मालिकाविश्वपासून दूर गेल्याचं पाहायला मिळालं. करिअरच्या शिखरावर असताना तिने लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता.

यावेळी तिची ‘हे मन बावरे’ ही मालिका चालू होती. मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यावर मृणाल आपल्या नवऱ्याबरोबर अमेरिकेत राहायला गेली आणि ती तिथेच स्थायिक झाली. अभिनयातून तिने काही काळासाठी ब्रेक घेतला असला तरी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहत असे. या काळात ती सोशल मीडियावर तिचे, तिच्या पती व मुलीबरोबरचे काही फोटो व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असे. तिने शेअर केलेल्या काही फोटोमध्ये मृणालच्या अमेरिकेतील घराची खास झलक पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by मृणाल (@mrunaldusanis_official)

यामध्ये काही फोटोमध्ये तिच्या घराची सुंदर बाल्कनी तसेच भिंतीवर सुंदर छायाचित्रे असलेली पाहायला मिळत आहेत. अभिनेत्री परदेशात राहूनही मराठी संस्कृती जपत असल्याचं तिच्या काही फोटोमधून पाहायला मिळत आहे, तिने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये तिच्या घरी कंदील लावल्याचे पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by मृणाल (@mrunaldusanis_official)

तसेच आकर्षक रांगोळी व दिव्यांची आरासही पाहायला मिळत आहे. तसेच एका फोटोमध्ये अभिनेत्री तिच्या मुली व पतीसह दिसत आहे. या फोटोमध्ये ते तिघेही उंच इमारतीतून बाहेर बघत आहेत. अशाप्रकारे मृणालनर शेअर केलेल्या फोटोमधून ती अमेरिकेत एका प्रशस्त व अलिशान घरात राहत असल्याचे दिसून येत आहे.

View this post on Instagram

A post shared by मृणाल (@mrunaldusanis_official)

दरम्यान, अखेर चार वर्षांनी अभिनेत्री आपल्या कुटुंबीयांबरोबर पुन्हा एकदा भारतात परतली आहे. काही दिवसांपूर्वी मृणाल भारतात परतली असून तिची पुन्हा एकदा मालिकांमध्ये काम करण्याची इच्छा असल्याचं तिने काही मुलाखतींमधून म्हटलं आहे. त्यामुळे आता चार वर्षांनी भारतात परतल्यावर अभिनेत्री मालिकांमध्ये पुनरागमन केव्हा करणार याकडे तिच्या चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Tags: marathi actressmarathi entertainment newsmrunal dusanisMrunal Dusanis Home
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Media One Solutions Presents Its Majja 'Aathvi-A' bts video

'आठवी-अ' वेबसीरिज नक्की कुठे शूट होते?, कसा चित्रित केला जातो प्रत्येक सीन, पाहा Inside Video

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.