‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, इकडे अहिल्यादेवी पारुला जाब विचारत असतात की हरीशवर तुझं प्रेम आहे का?, मात्र याचे उत्तर पारूकडे नसतं. त्यानंतर श्रीकांतमध्ये पडतो आणि सांगतो की, पारूला थोडा आपण तिचा वेळ देऊया. त्यानंतर अहिल्यादेवीनाही श्रीकांतचं हे बोलणं पटतं आणि ती मारुती आणि पारूला घरी जायला सांगते. त्याच वेळेला दामिनीमध्ये बोलते आणि पारूला काहीही बोलू लागते की, तुझं दोनदा लग्न मोडलं आहे. आता तुझं लग्न कोणत्यातरी एखाद्या म्हाताऱ्याशी लावून द्यावं लागेल नाहीतर लोक नाव ठेवतील. हे ऐकल्यावर अहिल्यादेवींचा संताप होतो आणि अहिल्यादेवी दामिनीला तोंड बंद ठेवायला सांगतात. (Paaru Serial Update)
तर इकडे घरी आल्यानंतर मारुती खूपच विचार करुन करुन थकलेला असतो. त्याला पुढे काय करावे हे सुचत नाही. दामिनीचे शब्द त्याच्या कानावर सतत येत असतात आणि शेवटी तो आत्महत्या करण्याचा निर्णय घेतो. पारू आणि गणीला घराबाहेरच ठेवून तो दरवाजा लावून घेतो आणि घरामध्ये जातो. तेव्हा पारू व गणी जोरजोरात आवाज देत दरवाजा उघडायला सांगतात पण मारुती कोणाचंच ऐकत नाही. त्यावेळेला पारू गणीला आदित्य सरांना बोलवायला पाठवते. गणि धावत बंगल्यात घेतो आणि सांगतो की, बाने स्वतःला कोंडून घेतलं आहे त्यामुळे तुम्ही लगेच चला. आदित्य, अहिल्यादेवी, श्रीकांत आणि घरातील सगळीच मंडळी पारूच्या घरी येतात तेव्हा मारुती घरातलं रॉकेल घेऊन स्वतःच्या अंगावर ओतत असतो. त्या वेळेला अहिल्यादेवी आदित्यला दार तोडण्याची अनुमती देतात तेव्हा प्रीतम आदित्य खूप प्रयत्न करुन दार तोडतात आणि मारुतीला वाचवतात.
त्यानंतर पारू जीव द्यायला जात असते तेव्हा अहिल्यादेवी जीव देणं हा काय खेळ आहे का? असं विचारुन सगळ्यांना शांत करतात. आणि सर्वांना थोडा आराम करायला सांगतात तर दुसऱ्या दिवशी इकडे मारुती शांत बसून असतो तेव्हा तो पारुला काहीच बोलत नाही. तेव्हा पारू सांगते की, तुम्ही माझ्याशी एकदा बोला माझ्याकडे एकदा पहा हे सगळं माझ्यामुळेच घडतंय. तर इकडे प्रिया येऊन प्रीतमला पारूच्या बाजूने विचार करण्याचा सल्ला देते.
तर आदित्य ही पारूची काळजी प्रीतमजवळ व्यक्त करतो तर इकडे पारू मारुतीला वचन देते की, माझ्यामुळे तुम्हाला त्रास होत आहे पण ही गोष्ट ज्याच्यामुळे घडते तीच आज मी संपवणार आहे. आता मालिकेच्या पुढील भागात पारू गळ्यातील मंगळसूत्र काढून टाकणार का?, गळ्यातील मंगळसूत्राबरोबरच हे नातं कायमचं संपवणार का?, यामुळे आदित्यच्या जीवाला काही धोका निर्माण होईल का? हे सारं पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.