सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आदित्यला जाहिरातीत पाहून अहिल्यादेवींना बसला खूप मोठा धक्का, ही सर्व परिस्थिती समजून घेतील का?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 29, 2024 | 9:35 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Paaru Serial Update

आदित्यला जाहिरातीत पाहून अहिल्यादेवींना बसला खूप मोठा धक्का, ही सर्व परिस्थिती समजून घेतील का?

‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, तिकडे सगळेजण अवॉर्ड फंक्शनसाठी आलेले असतात. दिशा व दामिनीसुद्धा येतात आणि त्या पहिल्याच रांगेत बसायला जातात तेव्हा तेथील अरेंजर सांगतात की, ही जागा फक्त विजेत्यांसाठी आहे त्यामुळे पाहुण्यांनी पाठी जाऊन बसावं. यावर त्यामागे जाऊन बसतात मात्र त्यांचा झालेला हा अपमान दोघींनाही सहन होत नाही. तर इकडे अहिल्यादेवी व श्रीकांत आलेले असतात आणि ते गेस्ट रुममध्ये बसून कार्यक्रमाची झलक लाईव्ह टीव्हीवरुन पाहत असतात. यावेळी ते प्रीतम, आदित्य, पारू या सगळ्यांनाच पाहत असतात. आदित्य अहिल्यादेवींना सतत फोन करत असतो मात्र त्या फोन कट करतात आणि सांगतात की, मी आज जर याचा फोन उचलला आणि याने मला खूप सारे प्रश्न विचारले तर मी ते प्रश्न टाळू शकणार नाही. (Paaru Serial Update)

मला त्यांना सरप्राईज देत त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा आहे म्हणून त्या फोन उचलत नाहीत. तर इकडे दिशा व दामिनी बोलत असतात त्यानंतर त्या बोलता बोलता बाहेर निघून जातात तेव्हा दामिनी दिशाला विचारते तू अशी बाहेर निघून का आलीस?, यावर दिशा सांगते की, मला तिथे बसण्यात काहीच इंटरेस्ट नाही आहे. त्यानंतर दामिनी सांगते की, खरा खेळ तर आता सुरु होणार आहे. चल आपल्याला तिकडे जायला हवं. यावर दिशा सांगते की, जेव्हा अहिल्यादेवींना ही गोष्ट कळेल ना त्यावेळेला मला काय घडणार हे बघायचे आहे. खूप माझा बिजनेस, माझं सर्व असं म्हणत मिरवत असतात ना, आता आदित्य किर्लोस्कर जेव्हा त्यांचं नाक कापेल हे त्यांना समजेल तेव्हा त्या काय व्यक्त करतील हे मला पाहायचे आहे. हे ऐकल्यावर दामिनी दिशाला विचारते, तू हे सगळं कशासाठी करत आहेस?, यावर दिशा म्हणते की, पावर. किर्लोस्कर या नावावर मला राज्य करायचं आहे हे ऐकल्यावर दामिनी शांत बसते. त्यानंतर त्या दोघी आत निघून जातात तेव्हा दिशा पारुला पाठीमागे पाठवून तिथे बसते मात्र त्या अरेंजर पुन्हा येऊन सांगतात की पाहुण्यांनी मागे जाऊन बसायचं आहे आणि विजेत्यांनी इथे बसायचं आहे तशी आम्ही सोयच केली आहे.

आणखी वाचा – “तुला या लोकांबरोबर झोपावं लागेल आणि…” त्या दिवसांमध्ये सई ताम्हणकरला वाईट अनुभव, म्हणाली, “एक मॅसेज आला तेव्हा…”

यावर दिशा मारुतीकडे बोट दाखवत सांगते की त्यांना इथे का बसवलं?, यावर आदित्य सांगतो की, प्लीज त्यांना पाठीमागे पाठवू नका त्यांना इथेच बसू द्या. तुम्ही हवं तर इथे एक खुर्ची अरेंज करु शकता का?, यावर दिशा सांगते, काही गरज नाही. मी मागे जाऊन बसते असं म्हणत ती मागे जाते आणि पारूला पुन्हा पुढे पाठवते. त्यानंतर आदित्यतला काही सुचत नसतं, त्यात अहिल्यादेवी त्याचा फोन उचलत नसतात म्हणून तो बाहेर निघून जातो त्याच्या पाठोपाठ पारूसुद्धा जाते. आदीत्यला पारू खूप समजवण्याचा प्रयत्न करते मात्र आदित्य काही समजून घेत नाही तितक्यात आदित्यचं नावही अनाउन्स केलं जातं आणि आदित्य स्टेजवर येतो. त्या वेळेला त्याच्या जाहिरातीचं भरभरुन कौतुक केलं जातं आणि हे अवॉर्ड देण्यासाठी स्पेशल गेस्टला बोलावलं जातं.

आणखी वाचा – तंटा नाय तर घंटा नाय! ‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या पर्वाचा प्रोमो प्रदर्शित, रितेश देशमुख कल्ला करायला सज्ज

हे स्पेशल गेस्ट म्हणजेच अहिल्यादेवी किर्लोस्कर व श्रीकांत किर्लोस्कर असतात. त्यांना पाहून आदित्य, प्रीतम, पारू सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. तर दिशा-दामिनी खूपच खुश होतात. त्यानंतर अहिल्यादेवी सांगतात की, ही जाहिरात मीच अजून पाहिली नाही आहे. यावर त्यांच्या शब्दाखातर ही जाहिरात पुन्हा एकदा लावली जाते. जाहिरात सुरु होते तेव्हा आदित्यला समोर पाहून अहिल्यादेवींना खूप मोठा धक्का बसतो. आता मालिकेत पुढे काय घडणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.

Tags: entertainmentmarathi serialpaaru serialPaaru Serial Update
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
Appi Amchi Collector

आर्या अर्जुनबरोबरचा साखरपुडा मोडणार?, अप्पी-अर्जुनला एकत्र पाहून घेणार मोठा निर्णय, अमोलची इच्छाही होणार पूर्ण

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.