शुक्रवार, एप्रिल 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आर्या अर्जुनबरोबरचा साखरपुडा मोडणार?, अप्पी-अर्जुनला एकत्र पाहून घेणार मोठा निर्णय, अमोलची इच्छाही होणार पूर्ण

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 29, 2024 | 10:00 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Appi Amchi Collector

आर्या अर्जुनबरोबरचा साखरपुडा मोडणार?, अप्पी-अर्जुनला एकत्र पाहून घेणार मोठा निर्णय, अमोलची इच्छाही होणार पूर्ण

‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत सध्या असं पाहायला मिळत आहे की, अमोल अप्पी व अर्जुन यांना एकत्र आणण्यासाठी खूप आटोक्याचे प्रयत्न करत असतो. वटपौर्णिमेची पूजा करताना जेव्हा आर्या व अप्पी समोरासमोर येतात तेव्हा त्यांच्यात वाद होतो. हा वाद पाहून अमोल अर्जुनला तिथे बोलावून घेतो. तर अमोलनेही वटपौर्णिमेचा उपवास ठेवलेला असतो जेणेकरुन त्याचे आई-बाबा एकत्र यावेत अशी त्याची इच्छा असते. आणि साता जन्मासाठी ते एकत्र राहावेत आणि त्याला तेच आई-बाबा भेटावेत या इच्छेखातर तो उपवास धरतो आणि वटपौर्णिमेची पूजाही करतो. त्यावेळी अचानक अमोलला चक्कर येते आणि तो खाली कोसळतो. (Appi Amchi Collector)

तातडीने अमोलला घेऊन अप्पी व अर्जुन घरी येतात आणि डॉक्टरांना बोलावून घेतात. तर उपवास धरल्याने त्याला चक्कर आल्याच त्यांच्यासमोर येतं. अर्जुन अमोलची तब्येत पाहून त्याच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतो आणि त्याला एकट्याला कसं टाकून जाणार बरं नसताना असं म्हणून तिथेच थांबतो. तर अमोलही अर्जुनने त्याच्या बरोबरच राहावे असा हट्ट धरतो. तर इकडे आर्यानेही अर्जुनसाठी निर्जळ उपवास केलेला असतो. हा निर्जळी उपवास सोडण्यासाठी आर्या अर्जुनची वाट बघत असते आणि ती कदमांच्या घरी जाऊन मोठमोठ्याने त्रागाही करते. तेव्हा अर्जुनचे बाबा सांगतात की, तू एकदा त्याला फोन करुन स्पष्टपणे बोलून घे.

आणखी वाचा – कर्क व कुंभ राशीच्या लोकांसाठी शनिवारचा दिवस लाभदायक, नोकरी-व्यवसायात होणार लाभ, जाणून घ्या…

यावर आर्या अर्जुनला फोन लावते आणि सांगते की, तू आत्ताच्या आता इथे निघून ये. मी निर्जळी उपवास केला आहे. तू इथे आल्याशिवाय मी काही उपवास सोडत नसते. यावर अर्जुन सांगतो की, मला आता इथून निघता येणार नाही कारण अमोलची तब्येत खराब आहे आणि मी त्याला एकट्याला सोडून येऊ शकत नाही.तुला मी तुला सॉरी म्हणतोय तू मला जरा समजून घे. यावर आर्या काहीच ऐकून घेत नाही. आर्या सांगते की, एक तर एका वेळेला तू एकच काहीतरी निवडशील आणि तुझं काय ठरणार आहे हे तू जोपर्यंत फिक्स करत नाहीस तोपर्यंत मी काही पुन्हा या घरात येत नसते, असं म्हणून ती फोन ठेवते आणि निघून जाते.

आणखी वाचा – पैसे कमावण्यासाठी अधिपतीचा कुस्ती खेळण्याचा निर्णय, अक्षराला नवऱ्याला साथ देणार का?, दोघांचंही बदलणार आयुष्य

तर इकडे अमोलची काळजी घेण्यात अर्जुन व अप्पी व्यस्त असतात आणि त्याला गोष्ट सांगत असतात. आणि गोष्ट सांगता सांगताच त्यांना झोप लागते आणि ते एकत्रच एकमेकांच्या हातात हात घेत झोपून जातात. आता अमोल अर्जुन व अप्पीला एकत्र कसं आणणार?, आर्या अर्जुनबरोबरचा साखरपुडा मोडणार का?, हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.

Tags: Appi Amchi CollectorAppi Amchi Collector Serial Updatemarathi serialzee marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Akshay Kelkar Father
Entertainment

अक्षय केळकरचे वडील आजही चालवतात रिक्षा, रिक्षाचालक आणि मराठी वादाबाबत म्हणाले, ” इथे कमवता आणि…”

एप्रिल 24, 2026 | 4:39 pm
kashmira kulkarni injured leg
Entertainment

पायाला दुखापत, शस्त्रक्रिया आणि…; ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम अभिनेत्री मालिकेतून घेणार ब्रेक?, मोठी अपडेट समोर

एप्रिल 24, 2026 | 1:55 pm
Sunita Ahuja viral video
Entertainment

गोविंदा आणि त्याच्या पत्नीमध्ये पुन्हा बिनसलं, समोर आलेल्या व्हिडीओने झालं स्पष्ट, Video व्हायरल

एप्रिल 24, 2026 | 12:55 pm
Gayatri Datar Wedding
Entertainment

मराठी अभिनेत्रीची लगीनघाई, ग्रहमखचे फोटो समोर, होणाऱ्या नवऱ्यानेही लग्नविधीचे फोटो केले शेअर

एप्रिल 24, 2026 | 11:51 am
Next Post
Shatrughan Sinha Health Update

लेकीच्या लग्नाच्या पाच दिवसांनी शत्रुघ्न सिन्हा यांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल, सोनाक्षीने नवऱ्यासह घेतली भेट

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.