बुधवार, सप्टेंबर 2, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

तंटा नाय तर घंटा नाय! ‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या पर्वाचा प्रोमो प्रदर्शित, रितेश देशमुख कल्ला करायला सज्ज

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 29, 2024 | 12:31 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi Season 5 New Promo

तंटा नाय तर घंटा नाय! 'बिग बॉस' मराठीच्या पाचव्या पर्वाचा प्रोमो प्रदर्शित, रितेश देशमुख कल्ला करायला सज्ज

छोट्या पडद्यावरील सर्वात वादग्रस्त व सर्वांचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘बिग बॉस’. हिंदी ‘बिग बॉस’सह प्रेक्षक ‘बिग बॉस मराठी’देखील तितक्याच आवडीनं पाहतात. त्यामुळे ‘बिग बॉस’ मराठीचे पाचवे पर्व कधी येणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं असतानाच काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस’ मराठी’च्या पाचव्या पर्वाची घोषणा करण्यात आली. एका खास प्रोमोद्वारे ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाची घोषणा करण्यात आली. यावेळी महेश मांजरेकरांऐवजी रितेश देशमुख शो होस्ट करणार असल्याचेही समोर आले.

‘बिग बॉस मराठी’चे आतापर्यंत चार पर्व झाले असून येत्या पाचव्या पर्वासाठी सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ‘बिग बॉस’चे आतापर्यंत चार पर्व झाले असून हे चारही पर्व चांगलेच गाजले. त्यामुळे आता पाचव्या पर्वाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. पहिल्या प्रोमोनंतर दुसरा प्रोमो कधी प्रदर्शित होणार? याची चाहत्यांना प्रतीक्षा होती. अखेर ‘बिग बॉस’ प्रेमींची ही उत्सुकता संपली आहे. नुकताच या शोचा एक नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे आणि हा नवीन प्रोमो प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधून घेत आहे.

View this post on Instagram

A post shared by @colorsmarathi

या नवीन प्रोमोची सुरुवात गेल्या काही पर्वातील स्पर्धकांच्या भांडणाने होते. त्यानंतर रितेश देशमुख त्याचा लोकप्रिय संवाद ‘तंटा नाय तर घंटा नाय’ असं म्हणतो. पुढे निखिल रत्नपारखी यांचीही या प्रोमोमध्ये एंट्री होते आणि ते “‘बिग बॉस’मध्ये हे सगळं असंच असतं” असं म्हणतात. यापुढे रितेश त्याच्या अनोख्या अंदाजात “यापुढे आता हे असंच नसणार. कारण आता मी आलो आहे. त्यामुळे कल्ला तर होणारच, तो पण माझ्या स्टाईलमध्ये” असं म्हणतो.

आणखी वाचा – कर्क व कुंभ राशीच्या लोकांसाठी शनिवारचा दिवस लाभदायक, नोकरी-व्यवसायात होणार लाभ, जाणून घ्या…

या व्हिडीओखाली ‘बिग बॉस मराठी’च्या व रितेश देशमुखच्या अनेक चाहत्यांनी त्यांना हा नवीन प्रोमो आवडला असल्याचे म्हटले आहे. या नवीन प्रोमोला प्रेक्षकांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. या प्रोमोखाली “लय भारी भाऊ, या सीझनची आम्ही आतुरतेने वाट बघत आहोत, हा शो कधी येणार आहे?” अशा अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तसेच अनेकांनी “प्रदर्शनाची तारीख का जाहीर केली नाही?” असंही विचारलं आहे.  

आणखी वाचा – पैसे कमावण्यासाठी अधिपतीचा कुस्ती खेळण्याचा निर्णय, अक्षराला नवऱ्याला साथ देणार का?, दोघांचंही बदलणार आयुष्य

दरम्यान, ‘बिग बॅास’ हा शो म्हणजे चाहत्यांसाठी कायमच औत्सुक्याची व कुतूहलाची बाब राहिली आहे. अशातच ‘बिग बॅास’ मराठीच्या पाचव्या पर्वाचे आलिशान घरही आकार घेऊ लागले आहे. तसेच ‘बिग बॅास’च्या घरातील अतरंगी मोहरे मोहरे नक्की कोण असणार? ‘बिग बॉस’च्या यंदाच्या पर्वात आणखी काय नाविन्य असेल? काय नवीन मनोरंजक पहायला मिळणार? अशा अनेक प्रश्नांकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Tags: bigg boss marathi season 5Bigg Boss Marathi Season 5 Newsmarathi entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
 Badshah and Isha Rikhi announced Divorce
Entertainment

पाच महिन्यानंतच संसार मोडला, सुप्रसिद्ध गायकाचा घटस्फोट, लग्नापूर्वी चार वर्ष केलं एकमेकांना डेट अन्…

सप्टेंबर 1, 2026 | 7:58 am
Next Post
Paaru Serial Update

आदित्यला जाहिरातीत पाहून अहिल्यादेवींना बसला खूप मोठा धक्का, ही सर्व परिस्थिती समजून घेतील का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.