Paaru Serial Update : ‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, आदित्यचा अपघात झाल्याची गोष्ट कळतात पारू धावत धावत हॉस्पिटलमध्ये येते, त्याच वेळेला दिशा व दामिनी तिला अडवतात. दिशा पारुला नको नको ते बोलते आणि सांगते की, याला सुद्धा तूच कारणीभूत आहेस, तिथं तुझा नवरा पळून गेला तर एकीकडे तुझ्या बापाने आत्महत्येचा प्रयत्न केला ही सगळी निगेटिव्हिटी घेऊन या हॉस्पिटलमध्ये आली आहेस ही निगेटिव्हिटी आम्हाला इथे नको आहे. तू जर वर गेलीस आणि आदित्यला भेटलीस तर त्याचं काहीतरी बरं वाईट होईल अशी धमकी दिशा पारुला देते त्यामुळे पारू पूर्णतः घाबरते की, आता माझ्यामुळे पुन्हा आदित्य सरांना काही व्हायला नको म्हणून ती खाली थांबण्याचा निर्णय घेते. तर इकडे प्रीतमला जेव्हा ही गोष्ट कळते तेव्हा तो प्रिया बरोबर धावत धावत हॉस्पिटलमध्ये येतो त्याच वेळेला तो येऊन अहिल्या देवींना घट्ट अशी मिठी मारतो आणि सांगतो की, मी आज दादा सारखं प्रेझेंटेशन केलं होतं आणि आता दादा इथे झोपला आहे हे ऐकून अहिल्या देवी प्रीतमला सांगतात की, तुझ्या दादाला काहीच होणार नाही.
तू आज दादासारख प्रेझेंटेशन दिलं ही चांगली गोष्ट आहे. दादा तुझा किती खंबीर आहे तुला माहित आहे ना मग तू दादा सारख खंबीर राहायला हवं. त्यानंतर प्रीतम आदित्यला आयसीयूच्या काचेतून बघतो आणि जोर जोरात रडू लागतो आणि सांगतो की, लवकर उठ आणि इथून आपण जायचं आहे. मी ही कंपनी काही सांभाळणार नाहीये. प्रेसेंटेशन मी तुला मी करावं असं वाटतं होतं म्हणून मी ते केलं. मी तर फक्त चील आणि एन्जॉय करणार आहे. मला हे सगळं काही करायचं नाहीये त्यावेळेला श्रीकांत त्याच्याजवळ येतो आणि त्याला समजावतो. त्याच वेळेला तिथे दिशा व दामिनीसुद्धा आलेले असतात. दिशा मुद्दाम तिला सुद्धा वाईट वाटलं असल्याचं नाटक करुन दाखवते.
यावर अहिल्यादेवी तिला सांगतात की, इथे कोणी रडू नका परिस्थिती काय आहे ती आता आपण पाहूया. त्याच वेळेला तिथे मारुती येतो तेव्हा दिशा त्याच्यावर ओरडते की, आदित्यचा ड्रायव्हर आहेस ना मग तू त्याच्याबरोबर जायला हवं होतं. यावर मारुती तिला सांगतो की, मी आदित्य सरांबरोबर जाणार होतो पण आदित्य सर म्हणाले मला महत्त्वाचं काम आहे त्यामुळे तुम्ही नका येऊ. हे सगळं सुरु असतानाच अहिल्यादेवी त्यांना थांबवतात आणि सांगतात की, आता आपण आदित्यच्या तब्येतीकडे फोकस करुया असं म्हणून दिशाला त्या गप्प करतात. त्यानंतर दिशा, आदित्यला मी भेटायला जाऊ का असं विचारते. तेव्हा अहिल्या देवी होकार देतात आणि आदित्यला दिशा भेटायला जाते तेव्हा तिथे जाऊन ती आदित्यला म्हणते की, तू माझ्या मार्गातला खूप मोठा अडथळा आहेस. तू या किर्लोस्कर कुटुंबाचा मोठा मुलगा आहे त्यामुळे हे सगळं काही तुझं होणार आणि तुझ्या बायकोचं होणार.
प्रीतमचं यात असं काहीच नाही आहे. त्यामुळे तू जर मेलास तर प्रश्नच नसेल. मी एक उत्तम माणूस नसेल पण मी खूप चांगली व्यवसायिका आहे असं ती आदित्यला बोलून दाखवते. तर आदित्य बेशुद्ध अवस्थेतच असतो. त्यानंतर इकडे पारू देवाला सांगते की, मी काही कामाची नाहीये त्यामुळे देवा हवं तर तू माझे प्राण घे पण आदित्य सरांना वाचव. हे सगळं काही मारुती ऐकतो आणि मारुती पारूला समजावतो. आता मालिकेच्या पुढील भागात कोणता दैवी चमत्कार होऊन आदित्य वाचणार का हे सारं पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.