मंगळवार, जून 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“साधा, सरळ नवरा हवा”, लग्नासाठी ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरी तयार, जोडीदाराविषयी म्हणाली, “शाकाहारी असावा आणि…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 31, 2024 | 8:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Jui Gadkari On Wedding

"साधा, सरळ नवरा हवा", लग्नासाठी 'ठरलं तर मग' फेम जुई गडकरी तयार, जोडीदाराविषयी म्हणाली, "शाकाहारी असावा आणि…"

‘ठरलं तर मग’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर असून या मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. आजवर या मालिकेच्या हटके कथानकाने प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवलं आहे. सायली ही भूमिका मालिकेत अभिनेत्री जुई गडकरी साकारताना दिसत आहे. ‘ठरलं तर मग’ मालिकेतील सायली या पात्रामुळे जुईला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. याशिवाय याआधीही जुईने अनेक मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका करत प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. (Jui Gadkari On Wedding)

जुईने प्रेक्षकांच्या मनात घर केलं असलं तरी जुई लग्न कधी करणार याकडे साऱ्यांच्या नजरा वळून राहिल्या आहेत. बरेचदा जुईला लग्न कधी करणार असा सवालही करण्यात आला आहे. यावर आता जुईने भाष्य केलं आहे. जुईने नुकतीच सुलेखा तळवलकर यांच्या ‘दिल के करीब’ या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी बोलताना तिने असं उत्तर दिलं की, “माझ्या घरी माझे आई-बाबा आणि मी राहते. आमचं एकत्र कुटुंब आहे. कर्जतमध्ये आधी आमचा खूप मोठा वाडा होता पण आता बिल्डिंग असून आम्ही सर्व एकत्र त्या बिल्डिंगमध्ये राहतो. मला खूप काकी, काका आहेत त्यामुळे मला एकत्र कुटुंबात राहायची सवय आहे”.

आणखी वाचा – “बाकीचे तोंड बंद करुन बसले आणि…”, वर्षा उसगांवकरांच्या बाजूने न बोलणाऱ्यांवर भडकली मराठी अभिनेत्री, म्हणाली, “त्यांना रडताना…”

View this post on Instagram

A post shared by Jui Gadkari (@juigadkariofficial)

पुढे ती म्हणाली, “मला पण असंच माझं स्वतःचं मोठं कुटुंब हवं आहे, मी अजून तरी मला हव्या असणाऱ्या या कुटुंबाबाबत विचार केला नाही आहे. सध्या जोरात काम सुरु आहे. पण अर्थात मलाही माझं कुटुंब हवं आहे. आता माझं खूप झालं. माझ्या मैत्रिणींची मुलं १०-१० वर्षांची आहेत त्यामुळे आता मलाही विचार करावा लागणार. मी नेहमीच असं म्हणते की, देवाने माझ्यासाठी खूप चांगले मार्ग ठेवले आहेत. इतका उशीर होत आहे म्हणजे अर्थात सगळं चांगलंच असेल”.

आणखी वाचा – सूरज चव्हाणला नॉमिनेट शब्द उच्चारता येईना, इंग्रजी शब्द उच्चारताना उडाला गोंधळ, शोमध्ये कसा टिकून राहणार?

पुढे ती असंही म्हणाली की, “मी त्याची वाट पाहत आहे. मला माझ्यासारखा साधा, सरळ, सोप्पा नवरा हवा आहे. पूर्णतः शाकाहारीही असावा. आणि कुटुंबात रमला पाहिजे असा असावा. आणि मुख्य म्हणजे मी ज्या क्षेत्रात काम करत आहे त्या क्षेत्राला तो समजून घेणारा हवा. आमच्या कुटुंबातील सर्व माणसं खूप लोभी आहेत, आणि तो जेव्हा आमच्या कुटुंबाचा भाग होईल तेव्हा नक्कीच ते त्याचे लाड करतील. हे सर्व सांभाळून त्याने मला सांभाळावं एवढीच इच्छा आहे”.

Tags: jui gadkarijui gadkari on weddingmarathi actresstharal tar mag
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Mahesh Manjrekar on Bigg Boss Marathi New Season Hosting

Bigg Boss Marathi : "सारखं सारखं तेच..." 'बिग बॉस'चं सूत्रसंचालन न करण्यावरुन महेश मांजरेकरांचं वक्तव्य, म्हणाले, "होस्ट बदलायचा की नाही..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.