शुक्रवार, जून 26, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अहिल्यादेवींचा बदलता अवतार, साखरपुड्यामध्ये दिशाला पारुची माफी मागायला लावणार, आदित्य-प्रितमलाही बसणार धक्का

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 19, 2024 | 12:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Paaru Serial Promo

अहिल्यादेवींचा बदलता अवतार, साखरपुड्यामध्ये दिशाला पारुची माफी मागायला लावणार, आदित्य-प्रितमलाही बसणार धक्का

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ या मालिकेवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करताना दिसत आहेत. या मालिकेत पारू व अहिल्यादेवी यांचा बंध फुलताना दिसत आहे. पारू व अहिल्यादेवी यांच्यावर या मालिकेचं कथानक फिरतांना दिसत आहे. सध्या मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहे. मालिकेत सध्या पारूचा ब्रँड एम्बेसेडर होण्याचा प्रवास पाहायला मिळत आहे, मालिकेत आलेल्या रंजक वळणांमुळे ही मालिका प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. (Paaru Serial Promo)

सध्या मालिकेत दिशा व प्रीतमचा साखरपुडा समारंभ होताना पाहायला मिळत आहे. दिशा व प्रीतमच्या साखरपुड्यासाठी किर्लोस्कर मेन्शनमध्ये सर्व जमलेले असतात. सुरुवातील प्रीतम यासाठी तयार नसतो मात्र अहिल्यादेवींच्या शब्दाखातर तो तयार होतो. त्यानंतर मालिकेत दिशा सर्वांसमोर प्रीतमला खोटी प्रेमाची कबुली देते. प्रीतमला दिशाच हे नाटक माहित असतं. त्यामुळे तो जास्त असं तेव्हा काहीच बोलत नाही.

आणखी वाचा – शुभमंगल सावधान! ‘जुळून येती रेशीमगाठ’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचा विवाहसोहळा थाटामाटात संपन्न, मराठी कलाकारांची गर्दी

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

तर एकीकडे दामिनीने साखरपुड्याच्या अंगठीची जबाबदारी ही पारूवर सोपवलेली असते. पारूकडून मात्र ती अंगठी हरवते. आणि ती अंगठी दामिनीनेचं चोरून तिच्या कपाटात लपवलेली असते. आता साखरपुड्यावेळी ही अंगठी पारू शोधणार का हे अद्याप समोर आलेलं नाही. अशातच मालिकेच्या नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मालिकेच्या या प्रोमोमध्ये दिशा चक्क पारूची माफी मागताना दिसत आहे.

आणखी वाचा – “आम्ही उत्तम बोलू शकतो म्हणून…”, राजकारणातील प्रवेशाबाबत मकरंद अनासपुरे स्पष्टच बोलले, म्हणाले, “आता म्हातारपणात…”

दिशा व प्रीतम यांचा साखरपुडा होणार असतो. दोघंही एकमेकांना अंगठी घालणार असतात. सगळेचजण दोघांच्या या साखरपुड्यासाठी खूप उत्सुक असतात. एकमेकांना अंगठी घालणार इतक्यात अहिल्यादेवी थांबवतात. आणि दिशाला बोलतात, दिशा आधी तू पारूची माफी माग. यावर दिशा असं बोलताना दिसत आहे की, “पारू मला माफ कर. मी तुझा अपमान केला. तुला नको नको ते बोलले”, असं सर्वांसमोर बोलते. हे ऐकून पारूला धक्का बसतो. आता अहिल्यादेवींनी दिशाला पारूची का माफी मागायला लावली असेल याची उत्सुकता लागून राहिली आहे.

Tags: entertainmentmarathi serialpaaru serialPaaru Serial Promozee marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 Lalit Prabhakar As Ajmal Kasab
Entertainment

“चॉकलेट बॉय आता अजमल कसाबच्या भूमिकेत”, मराठी अभिनेत्याचा लूक पाहून सगळेच थक्क, तर उज्ज्वल निकम…

जून 26, 2026 | 11:40 am
Mamachya Govyala Jauya Teaser
Entertainment

धमाल, मस्ती करत गोव्यात ट्रिप; ‘मामाच्या गोव्याला जाऊया’च्या टिझरने वाढविली उत्सुकता, संत्या, कुशा, बाबा आणि…

जून 26, 2026 | 10:58 am
priyanka chopra on gender roles
Entertainment

“जेवण करणं, साफसफाई करणं स्त्रियांचं काम…”, प्रियांका चोप्राचं मोठं वक्तव्य, म्हणाली, “आळशीपणा…”

जून 26, 2026 | 10:30 am
Sakav marathi web series
Entertainment

बाप-लेकाची कथा असलेला ‘साकव’चा ट्रेलर समोर, दिगंबर नाईकांच्या भूमिकेची कमाल, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

जून 25, 2026 | 3:36 pm
Next Post
The Family Man third season will be released soon see the details

बहूचर्चित ‘द फॅमिली मॅन’ सीरिजच्या आगामी सीझनच्या शूटिंगला सुरुवात, लवकरच प्रदर्शित होणार तिसरा सीझन, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.