शनिवार, जून 27, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“चॉकलेट बॉय आता अजमल कसाबच्या भूमिकेत”, मराठी अभिनेत्याचा लूक पाहून सगळेच थक्क, तर उज्ज्वल निकम…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 26, 2026 | 11:40 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
 Lalit Prabhakar As Ajmal Kasab

"चॉकलेट बॉय आता अजमल कसाबच्या भूमिकेत", मराठी अभिनेत्याचा लूक पाहून सगळेच थक्क, तर उज्ज्वल निकम…

 Lalit Prabhakar As Ajmal Kasab : मॅडडॉकने नुकतीच ‘ईठा’ या चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटाच्या टिझरने साऱ्यांच्या मनात घर केलं. मात्र यापाठोपाठ आता त्यांनी आणखी एका चित्रपटाचा टिझर प्रदर्शित केला. ज्याने साऱ्यांचं लक्ष वेधलं. येत्या ७ ऑगस्टला ‘प्रहार-द उज्ज्वल निकम स्टोरी’ या नव्या चित्रपटाची घोषणा केली. आणि साऱ्यांच्या भुवया उंचावल्या. चित्रपटाचं पोस्टर आणि कलाकारांच्या लूकची सध्या सोशल मीडियावर सर्वात जास्त चर्चा सुरु आहे. प्रहार हा सिनेमा ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकमच्या जीवनावर आधारित आहे. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात एकमेव पकडला जाणारा दहशतवादी अजमल कसाबला फाशीची शिक्षा मिळावी यासाठी धडपड करणाऱ्या ज्येष्ठ विधीज्ञ आणि सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या जीवनपटावर हा चित्रपट असणार आहे.

चित्रपटाचा टिझर मराठी प्रेक्षकांना सुखद धक्का देणारा ठरला. कारण मराठमोळा अभिनेता, मराठी कलाविश्वाचा चॉकलेट बॉय ललित प्रभाकर या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. ललित प्रभाकर या चित्रपटात अजमल कसाबच्या भूमिकेत दिसणार आहे. मराठी प्रेक्षकांनी ललितला आजवर रोमँटिक भूमिकांमध्ये पाहिलं आहे. ललितच्या आजवरच्या सगळ्या भूमिका या सौम्य आणि सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या होत्या. अशातच ललितची ही अग्रेसिव्ह भूमिका साऱ्यांना थक्क करणारी आहे.

आणखी वाचा – व्हीलचेअरवरून स्टेजवर पोहोचली, गंभीर आजार आणि…; सुप्रसिद्ध गायिकेला पाहताच कलाविश्वात खळबळ

View this post on Instagram

A post shared by Lalit Prabhakar (@lalit.prabhakar)

समोर आलेल्या टिझरमध्ये अजमल कसाबच्या भूमिकेत ललित अगदी हुबेहूब दिसत आहे. त्यामुळे कलाकारांसह, चाहतेमंडळीही यावर कमेंट करत आहेत. “ललितचा लूक पाहून शॉक बसला”, “ललितला मानलं पाहिजे”, “मराठीचा चॉकलेट बॉय आता अजमल कसाबच्या भूमिकेत?”, अशा अनेक कमेंट आल्या आहेत. चित्रपटात उज्ज्वल निकम ही भूमिका अभिनेता राजकुमार राव साकारत आहे.

Tags: ajmal kasabbollywood movielalit prabhakar
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Daryabhavani Movie poster release
Entertainment

सागरी सामर्थ्याचा गौरवशाली इतिहास दिसणार ‘दर्याभवानी’मध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जलझुंजाची गाथा उलगडणार

जून 27, 2026 | 4:12 pm
mumbai local train news
Entertainment

“सरकार काय करतंय, इथे जीवाची किंमत नाही”, मुंबई लोकल ट्रेनमध्ये तरुणाच्या हत्येने सुप्रसिद्ध अभिनेत्रीला धक्का, म्हणाली…

जून 27, 2026 | 12:50 pm
Hardik Pandya and Mahieka Sharma get married
Entertainment

कपाळाला टिकली, भांगेत सिंदूर आणि…; हार्दिक पांड्याने केलं गुपचूप लग्न? गर्लफ्रेंडबरोबरचे फोटो व्हायरल

जून 27, 2026 | 10:33 am
Nikhil Chavan and Anushka Sarkate
Entertainment

फुलांच्या पायघड्या, औक्षण अन्…; अनुष्का सरकटेचं सासरी जंगी स्वागत, गोंधळातही जोड्याने थिरकले…

जून 27, 2026 | 9:51 am
Next Post
Nikhil Chavan and Anushka Sarkate

फुलांच्या पायघड्या, औक्षण अन्…; अनुष्का सरकटेचं सासरी जंगी स्वागत, गोंधळातही जोड्याने थिरकले…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.