गुरूवार, जून 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बाप-लेकाची कथा असलेला ‘साकव’चा ट्रेलर समोर, दिगंबर नाईकांच्या भूमिकेची कमाल, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 25, 2026 | 3:36 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Sakav marathi web series

बाप-लेकाची कथा असलेला 'साकव'चा ट्रेलर समोर, दिगंबर नाईकांच्या भूमिकेची कमाल, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Sakav marathi web series : बाप-लेक अशा दोन किनाऱ्यांना जोडायला साकव हवा होता आणि लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्जही झाला आहे. हो. साकव या वेबसीरिजचा टिझर पाहूनच उत्सुकता वाढली होती. पण नुकत्याच समोर आलेल्या ट्रेलरने ही उत्सुकता अधिक ताणली आहे. कारण बाप लेकाची अनोखी कथा असलेली ही वेबसीरिज अर्थात मनाला भिडणारी आहे. कोकणात शूट झालेल्या या वेबसीरिजची झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. संवाद ऐकून तर कान तृप्त झाले आणि पहिला भाग कधी येणार याची उत्सुकता वाढली.

समोर आलेल्या ट्रेलरमधील हळुवार आवाजात लागणार बॅकग्राउंड म्युझिक, कलाकारांचे अभिनय अर्थात मनाला स्पर्शून जात आहेत. अभिनेते दिगंबर नाईक अभिनेत्री अस्मिता खतखते ‘गाव गाता गजाली’नंतर पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत याने ही उत्सुकता द्विगुणित केली. दोघांची मालवणी भाषेवर असलेली पकड आणि अभिनयाची गुर्मी या ट्रेलरमध्ये अधिक भर घालत आहे. बाप आणि लेक त्यांची कर्तव्य जपण्यात इतके व्यस्त असतात की, त्यांचं त्यांचं जगायचं राहून जात अशी काहीशी भावना यामधून झाली.

आणखी वाचा – भर कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेत्रीने दिली गुडन्यूज, लवकरच होणार आई, दुसऱ्यांदा लग्न आणि…

वडिलांच्या इच्छा, अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मुलाची धडपडही या ट्रेलरमध्ये दिसली. त्यामुळे या दोघांचं नातं नेमकं कसं आहे हे पाहण्याची उत्सुकता आहे. ‘इट्स मज्जा ओरिजनल’ आणि ‘मीडिया वन सोल्युशन्स’ प्रस्तुत ही ‘साकव’ वेबसीरिज आहे. ‘इट्स मज्जा ओरिजनल’ने आजवर ‘आठवी-अ’, ‘दहावी-अ’, ‘मैत्रीचा सातबारा’, ‘पाऊस’, ‘पाऊस २’ या अनेक आशयाच्या वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीस आणल्या. आणि त्यांनी ‘अकरावी’ या वेबसीरिजची घोषणा केली यासाठीही प्रेक्षकवर्ग उत्सुक आहेत. आणि यांत भर घालत आता एका अनोख्या आणि अतिशय महत्त्वाच्या नात्यावर भाष्य करणारी ‘साकव’ ही वेबसीरिज त्यांनी आणली आहे.

आणखी वाचा – व्हीलचेअरवरून स्टेजवर पोहोचली, गंभीर आजार आणि…; सुप्रसिद्ध गायिकेला पाहताच कलाविश्वात खळबळ

निर्माते सौरिंद्र नाथ दत्ता यांची निर्मिती असलेली ही ‘साकव’ ही वेबसीरिज असून नितीन वाडेवाले यांनी या सीरिजच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. तर सीरिजचे लेखन नितीन पवार यांनी केले आहे. आणि प्रॉडक्शन व क्रिएटिव्ह हेड म्हणून अंकिता अशोक प्रतिभा लोखंडे यांनी संभाळली आहे. कोकणात शूट झालेल्या या वेबसीरिजमध्ये कोणते कलाकार असणार हे गुलदस्त्यात असल्याने वेबसीरिज कधी येणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.

Tags: its majjamarathi webseriesSakav
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Sakav marathi web series
Entertainment

बाप-लेकाची कथा असलेला ‘साकव’चा ट्रेलर समोर, दिगंबर नाईकांच्या भूमिकेची कमाल, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

जून 25, 2026 | 3:36 pm
alka yagnik health concerns
Entertainment

व्हीलचेअरवरून स्टेजवर पोहोचली, गंभीर आजार आणि…; सुप्रसिद्ध गायिकेला पाहताच कलाविश्वात खळबळ

जून 25, 2026 | 1:00 pm
Samantha Ruth Prabhu Confirm her Pregnancy
Entertainment

भर कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेत्रीने दिली गुडन्यूज, लवकरच होणार आई, दुसऱ्यांदा लग्न आणि…

जून 25, 2026 | 12:00 pm
Lohagad Fort murder case
Social

“अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का”, केतन खून प्रकरणानंतर सोशल मीडियावर संताप, नेटकरी भडकले

जून 25, 2026 | 10:44 am
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.