Paaru Marathi Serial Update : ‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, प्रीतमच्या वागण्याचा सगळ्यांनाच त्रास झालेला असतो. तर इकडे आदित्य समोर प्रीतम प्रियाच्या नात्याचा खुलासा होतो मात्र आदित्य दोघांचेही नातं स्वीकारायला तयार होत नाही. प्रीतम प्रियाला घेऊन निघून जात असतो. तितक्यात आदित्य व पारू देखील त्याच्या मागोमाग येतात. त्यानंतर प्रिया प्रीतमला थांबवते आणि सांगते की, तुम्ही तुमच्या माणसांमध्ये जा. तुम्हाला तुमच्या माणसांची खूप गरज आहे. तुम्ही त्यांच्या शिवाय राहू शकत नाही आणि असं म्हणत प्रीतमला शेवटची घट्ट अशी मिठी मारून निघून जाते. प्रीतमही प्रियाला रडत रडतच निरोप देतो.
त्यानंतर प्रीतम पाठी फिरतो तर त्याला आदित्य व पारू दिसतात. तेव्हा तो आदित्यला म्हणतो की, तुझ्या मनासारखा झालं ना?, जी मुलगी मला सांगते की तू तुझ्या माणसांमध्ये राह ती मुलगी वाईट असूच कशी शकते?, तू प्रियाला ओळखण्यास खूपच मोठी चूक केली आहेस. आता जसं तू म्हणशील त्या मुलीशी मी लग्न करायला तयार आहे. तू म्हणतोस ना आईने दिशा बरोबर लग्न ठरवलं आहे तर मी दिशा बरोबर लग्न करतोय पण काही वर्षांनी आमचं पटलं नाही तर तू माझ्याकडे सॉरी बोलायला येऊ नकोस तेव्हा मी तुला बिलकुल माफ करणार नाही, असं म्हणून प्रीतम निघून जातो. तर आदित्य संभ्रमात पडतो. दुसऱ्या दिवशी सगळेजण डायनिंग टेबलवर असतात तेव्हा दिशा मुद्दाम प्रीतमची खोड काढण्यासाठी सासूबाईंना तू सॉरी म्हणायला हवं, कालचे प्रकरण झालं ते चूक होतं याबद्दल बोलते. त्यावर प्रीतम मी हे मुद्दाम नाही केलं असं म्हणत स्वतःची बाजू मांडतो. तेव्हा दिशा त्याला सांगते, तू तुझी बाजू मांडू नको, तू माफी माग. त्यानंतर प्रीतम दिशाला शांत करतो आणि शांत बसायला सांगतो. त्यानंतर त्यांच्यात भांडणं होतात हे पाहून अहिल्यादेवी हा सगळा वाद थांबवत प्रीतमवर चिडतात.
त्यानंतर प्रीतम तिथून निघून जातो. तर इकडे पारू व सावित्री एकमेकींशी बोलत असतात. तेव्हा सावित्री म्हणते की, दिशा मॅडम उगीचच प्रीतम सरांना डिवचत आहेत. त्यामुळे ते रागात काहीही बोलून जातात. अशावेळी त्यांनी शांत राहायला हव पण त्यांना हे कळतच नाहीये. त्यानंतर सावित्री म्हणते की, ब्रँड अँबेसिडर तिला बनायचं होतं त्याच दिवशी अहिल्यादेवींनी तिच्या हाताला धरुन तिला बाहेर काढायला हवं होतं, हे दिशा ऐकते आणि सावित्रीच्या कानाखाली मारायला येते. तितक्यात पारू तिचा हात धरते मात्र दिशा पारूला आठवण करुन देते की, मी या घराची मालकीण आहे. तू माझा हात पकडला तर काय होईल हे तुला माहित आहे ना?, तेव्हा पारू हात सोडून देते. त्यानंतर पारू दिशाकडे विनंती करते की, तुम्ही प्रीतम सरांना त्रास देऊ नका त्यांच्याशी चांगले वागा मात्र दिशा सांगते की, मी चांगलं वागू शकत नाही.
आता मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, दिशाच्या काही मैत्रिणी आलेल्या असतात आणि त्या प्रीतमशी तिची भेट घडवून देतात. तेव्हा दिशा त्यांच्या सगळ्या पर्सेस प्रीतमच्या गळ्यात अटकवते आणि सांगते की, आता तुला कळेल तुझी खरी जागा कुठे आहे. हे सगळं काही आदित्य बाहेरुन बघत असतो. प्रीतमचा अपमान पाहून आदित्यचा खूप संताप होतो. आता आदित्यला दिशाचा खरा चेहरा कळला असेल का?, आदित्य दिशाच्या विरोधात जात प्रिया व प्रीतमच नातं स्वीकारेल का? हे सारं पाहणं रंजक ठरेल.