Paaru Marathi Serial Update : ‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, तिकडे पारू किचनमध्ये काम करत असते. तर दिशाच्या काही मैत्रिणी येणार म्हणून ती खूपच खुश असते आणि शिवाय तिला तिच्या सासरच घर तिच्या मैत्रिणींना दाखवायचं असतं असं ती अहिल्या देवींना सांगते. तर प्रीतम व आदित्य ऑफिसला जात असतात तेव्हा दिशा मुद्दाम अहिल्या देवींसमोर प्रीतमला तू घरीच थांब ना मला माझ्या मैत्रिणींशी तुझी भेट घडवायची आहे असं सांगते. यावर प्रीतमही होकार देत हो चांगला मुलगा नाही तर चांगला नवरा तरी होतो असं टोमणा देत घरीच राहायचं ठरवतो.
त्यानंतर आदित्य व अहिल्यादेवी ऑफिसला निघून जातात. त्यानंतर दिशा प्रीतमला स्वतःच्या तालावर नाचवते. त्याला उठायला, बसायला सतत सांगत असते आणि प्रीतम ही तिच्या मनासारखाच वागत असतो. तर इकडे पारू किचनमध्ये काम करताना ती प्रियाला फोन लावते आणि तुम्ही कशा आहात अशी चौकशी करते. तेव्हा प्रियाकडून कळतं की, ती आज पाच वाजताच्या गाडीने कायमची गावाकडे निघून जाणार आहे. तिला तिच्या आबांनी गावी बोलावलं असल्यास ती सांगते आणि प्रीतम बद्दलची काळजी ही ती व्यक्त करते. तर इकडे आदित्य व पारू एकमेकांशी प्रीतमबद्दल बोलतात. आदित्यला प्रीतम व प्रियाचं नातं मान्य नसतं त्याबद्दल आदित्य पारुला विचारतो की, दिशा ही योग्य मुलगी आहे की नाही? आणि प्रीतम बरोबर तिचं लग्न व्हावं की नाही?, मला तुझं मत जाणून घ्यायचं आहे.
यावर पारू उत्तर देत म्हणते की, खरं मनातलं सांगायचं तर जोड्या या स्वर्गातच जुळलेल्या असतात आपण फक्त प्रयत्न करायचे तुम्ही असेच प्रयत्न करत आहात. आता देवाच्या मनात काय आहे ते नाही माहित पण प्रीतम सरांचं जर दिशा मॅडम बरोबर लग्न झालं तर ते सुखी राहू शकत नाही. हे एकच वाक्य आदित्यला खटकतं आणि आदित्य ऑफिस मधून पुन्हा घरी येतो कारण त्याला शंका असते की दिशा तिच्या मैत्रिणींसमोर प्रीतमची लाज काढेल. दिशाच्या मैत्रिणी आल्यानंतर दिशा त्यांच्या खांद्यावरील पर्सेस प्रीतमच्या गळ्यात लटकवते आणि प्रीतमला पाणी द्यायला सांगते. हे सगळं काही आदित्य बाहेरुन बघत असतो. तर पारूलाही हे काही पाहवत नाही. त्यानंतर पारू बाहेर येते. तर तिला आदित्य दिसतो. आदित्य म्हणतो की, आता हे खूप अति झालं. तरी मला वाटलंच होतं की, ही दिशा काहीतरी करेल. माझ्या मनाला तू दिलेलं मत खात होतं म्हणून मी ऑफिसमधून तडक निघून आलो. त्यानंतर पारू आदित्यला थांबवते आणि सांगते की, आता नाही आता ही वेळ नाहीये. देवीआईसमोर दिशाचा खरा चेहरा आणण्याची. त्यामुळे आपल्याला इथेच थांबाव लागेल. आणि सांगते की, प्रिया मॅडम कायमच्या गावी निघून चालल्या आहेत.
आता तरी तुम्ही प्रिया व प्रीतम यांचं प्रेम मान्य करा. मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, आदित्य पारू व प्रीतमसह प्रियाला भेटायला जातो आणि सांगतो की, मला तुमचं लग्न मान्य आहे. तुम्ही दोघं लग्न करू शकता. तू माझ्या भावाशी लग्न करशील का? असं म्हणत प्रियाला मागणी घालतो. यावर प्रिया दूर जात सांगते की, पण हे लग्न होऊ शकत नाही. माझे आबा या लग्नाला कधीच तयार होणार नाहीत. आता मालिकेत पुढे काय होईल हे पाहणं रंजक ठरेल.