Kaumudi Walokar Kelvan : सिनेसृष्टीत सध्या लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत असतानाच आता मालिका विश्वातील आणखी एक लोकप्रिय चेहरा लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे. अनेक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकत असतानाच ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अभिनेत्री कौमुदी वलोकर ही लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वीचं कौमुदीच्या लग्नाची जोरदार चर्चा सर्वत्र सुरु असलेली पाहायला मिळाली होती. तर कौमुदीच्या साखरपुड्यानंतर तिच्या लग्नाची साऱ्यांना उत्सुकता लागून राहिली होती.
अशातच आता कौमुदी लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचं समोर आलं असून तिच्या केळवणाचे फोटोही समोर आले आहेत. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने आजवर प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. गेली पाच वर्षे ही मालिका प्रेक्षकांचे अविरतपणे मनोरंजन करताना दिसतेय. मात्र या मालिकेने आता प्रेक्षकांचा निरोप जरी घेतला असला तरी मालिकेतील कलाकार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेले पाहायला मिळतात. अशातच कौमुदीच्या केळवणा निमित्त ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील कलाकारांनी तिच्यासाठी खास केळवणाचा घाट घातला असल्याचं पाहायला मिळालं.
केळीच्या पानांवर कौमुदीचे केळवण असं लिहिलेल्या सजावटीने तिच्या केळवणाची जय्यत तयारी केलेली पाहायला मिळाली. यावेळी अश्विनी महांगडे, अभिषेक देशमुख आणि त्याची पत्नी ही कलाकार मंडळी कौमुदीच्या केळवणासाठी उपस्थित होती. अगदी थाटामाटात त्यांनी तिचं केळवण साजरं केलं. पारंपरिक अंदाज तसेच खास भेटवस्तू देत केळवणाचा सुंदर असा व्हिडीओ देखील त्यांनी इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
आणखी वाचा – शत्रुघ्न सिन्हा पत्नीची करत होते फसवणूक, लग्न होऊनही अनेक मुलींशी होते संबंध, म्हणाले, “मला पश्चाताप…”
काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीच्या भावडांनी तिची बॅचलर पार्टी साजरी केली आहे. याबद्दल तिने सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे. बॅचलर पार्टीचे काही खास फोटो शेअर करत कौमुदीने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. कौमुदीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ‘शाळा’ चित्रपटामधून ती मोठ्या पडद्यावर झळकली होती. तसेच छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेत तिने साकारलेली आरोही प्रेक्षकांनासुद्धा भावली.





