मनोरंजन सृष्टीतून एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे टीव्ही अभिनेत्री दृष्टी धामी आणि तिचा पती नीरज खेमका यांच्या घरात चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. ‘मधुबाला’ फेम अभिनेत्रीची गरोदरपणाच्या १० व्या महिन्यात प्रसूती झाली असून तिने एका मुलीला जन्म दिला आहे. अभिनेत्रीला कन्यारत्न प्राप्त होतच सोशल मीडियासह सर्वच माध्यमातून तिच्यावर कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. तिचे अनेक चाहते मंडळी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. (Drishti Dhami Mother)
इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने आपल्या घरी कन्या आल्याची बातमी सांगितली आहे. दृष्टी धामीने लेकीच्या जन्माची गुडन्यूज देत इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे आणि या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, “ती आली आहे. २२ ऑक्टोबर २०२४. स्वर्गातून थेट आमच्या हृदयात. एक नवीन जीवन. एक नवीन सुरुवात”. दृष्टीच्या या पोस्टवर चाहते मंडळी व कलाकार मंडळींकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू आहे. अनेकांनी तिला या पोस्टखाली कमेंट्स मध्ये अभिनंदन असं म्हटलं आहे.
तिची मैत्रिण सनाया इराणीने लिहिले, ‘माझी मुलगी आली आहे.’ शक्ती अरोरा यांनी अभिनंदन केले. जेनिफर विंगेट, रुबिना दिलीक, नकुल मेहता, करण ग्रोव्हर, दिशा परमार, आदिती गुप्ता, पूजा गौर, सुमोना चक्रवर्ती, मौनी रॉय, सुरभी ज्योती, किश्वर मर्चंट यांच्यासह अनेक चाहत्यांनीही या जोडप्याचे अभिनंदन केले आहे. यापूर्वी, दृष्टी धामीने एक मजेदार पोस्ट शेअर केली होती की ४१ आठवडे झाले आहेत आणि बाळ अद्याप बाहेर आलेले नाही. आता तर ती चिडचिडही झाली आहे. याच पोस्टवर राहुल वैद्य यांची पत्नी दिशा यांनी सांगितले की, त्यांच्या बाळाला इतकी घाई होती की ते ३७ व्या आठवड्यातच बाहेर आले.
दरम्यान, लग्नाच्या नऊ वर्षांनी दृष्टी आई झाली आहे. तिने ‘दिल मिल गए’, ‘गीत’, ‘मधुबाला’, ‘एक था राजा एक थी रानी’ आणि ‘सिलसिला बदलते रिश्तों का’ यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. तिने ‘झलक दिखला जा ६’ हा डान्स शो जिंकला आहे. २१ फेब्रुवारी २०१५ रोजी बिझनेसमन नीरज खेमकासोबत लग्न केले. लग्नाच्या ९ वर्षानंतर ती आई झाली.