Paaru Marathi Serial Update : ‘पारू’ मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, प्रिया व प्रीतमच्या लग्नानंतरचे विधी जोरदार सुरु असतात. पारूच्या मदतीने हे सर्व काही सुरळीत होत असतं. तर मध्ये मध्ये दामिनी खोडा घालण्याचं काम करत असते. प्रिया तिच्या रुममध्ये असते तेव्हा दामिनी संधी साधून प्रियाला भेटते आणि तिला तिच्या बाजूने वळवायचा प्रयत्न करते. प्रियाला दामिनी असेही सांगते की, ‘नव्याचे नऊ दिवस आहेत त्यामुळे तुला जो काही मान मिळतोय तेवढा मिरवून घे, कारण एकदा का आदित्यची बायको आली की मग तुझा हा मान आपोआप कमी होईल. कारण की ती या घराची मोठी सून असेल. माझेही तसेच झालं अहिल्यादेवींच्या हातात सगळा कारभार आहे आणि मी नुसती या घरात सून म्हणूनच राहतेय’, हे ऐकल्यावर प्रियाला काहीच कळत नाही.
त्यानंतर दामिनी पारू बद्दलही प्रियाच्या मनात विष कालवण्याचा प्रयत्न करते. ती सांगते की, ‘आदित्य व पारू गावाकडे नवरा-बायको म्हणून राहत होते त्यामुळे तिच्या मनात एकदा तरी आलं असेल की आपण या घराची मालकीण व्हावं, आपण या घराची सून व्हावे’. यावर प्रिया सांगते की, ‘असं काहीच नाहीये मी पारुला चांगलं ओळखते’. त्यानंतर दामिनी प्रियाला म्हणते की, ‘तुला तर वहिनींनी लंकेची पार्वतीच केलं आहे कारण तुझ्या गळ्यात काहीच नाहीये, पण एकदा ऍड शूटसाठी पारूला त्यांनी किर्लोस्कर कुटुंबाचे पारंपारिक दागिने दिले होते आणि तुला दिले नाही. हो पण काही वेळातच ते देतीलही’, असेही ती सांगते आणि तिथून निघून जाते.
आणखी वाचा – निवेदिता सराफ व मंगेश देसाई यांच्या नवीन मालिकेची वेळ जाहीर, ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
त्यानंतर अहिल्यादेवी सगळ्यांनाच खाली बोलवतात. तेव्हा अहिल्यादेवी नव्या सूनेची स्टाफबरोबर ओळख करुन देत असतात. अहिल्यादेवी प्रियाला किर्लोस्कर कुटुंबाचा एक पारंपारिक सुंदर असा हार देतात आणि सांगतात, ‘आता तू किर्लोस्करांची सून शोभतेयस’. त्यानंतर सगळ्यांशी ओळख करुन देतात की, ‘या तुमच्या छोट्या मालकिन बाई आहेत’. हे झाल्यानंतर प्रिया सगळ्यांना भेटवस्तू देत असते. तेव्हा दामिनी मुद्दाम पारुलाही भेटवस्तू घ्यायला रांगेत उभं करते आणि सांगते की, ‘तू या घराची नोकर आहेस त्यामुळे तू सुद्धा भेटवस्तू घ्यायला रांगेत उभं राहायला हवे’. हे दामिनीचं वागणं सगळ्यांनाच खटकतं, मात्र कोणीच त्यावेळेला काही बोलत नाही. कारण त्या वेळेला काही बोललं तर ते चुकीचं ठरलं असतं म्हणून सगळे शांत राहतात. मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, सगळेचजण डायनिंग टेबलवर बसलेले असतात.
आणखी वाचा – घर बळकाण्याचा प्रयत्न, लहान मुलाला भेटू देत नाही अन्…; Bigg Boss 18 फेम हेमा शर्मावर माजी पतीचे गंभीर आरोप
तेव्हा प्रिया दामिनीच्या जागेवर बसते हे पाहून दामिनीचा पारा चढतो आणि रागात ती म्हणते की, ‘तू आधी या घराची नोकर होतीस आणि आता तू माझी जागा बळकवायला निघाली आहेस का?, तुझी माझ्या जागेवर बसायची हिंमतच कशी झाली’, आता प्रिया यावर काय उत्तर देणार?, अहिल्यादेवी यावर काय बोलणार हे सर्व पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.