‘बिग बॉस मराठी’ चं पाचवं पर्व प्रचंड गाजलं. यामुळे ‘बिग बॉस’च्या घरातील सदस्यही चर्चेत आले. ‘बिग बॉस’च्या घरात पहिल्या दिवसापासून वादावादी, मैत्री आणि भांडण पाहायला मिळालं. पण त्याचबरोबर ‘बिग बॉस’च्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झालेले सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर धनंजय पवार यांनी त्यांच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकली. धनंजय हे आपल्या आई व बायकोबरोबरचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांच्या व्हिडीओला नेटकऱ्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळत असतो. (Dhananjay Powar Enjoying With Wife In Goa)
‘बिग बॉस मराठी ५’ मधून धनंजय पोवार बाहेर आले असले तरी त्यांच्या नावाची चर्चा काही कमी झालेली नाही. ‘बिग बॉस’नंतर धनंजय पुन्हा एकदा पत्नीबरोबरचे मजेशीर व्हिडीओ शेअर करत आहे आणि त्याच्या या व्हिडीओला चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. धनंजय सध्या त्याच्या पत्नीसह गोव्यामध्ये एन्जॉय करत आहे आणि या गोवा ट्रीपचे व्हिडीओ तो सोशल मीडियाद्वारे शेअर करत आहे.
धनंजयने पत्नीबरोबरचे हे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओला चाहत्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. धनंजय पोवारए त्यांच्या कॉमेडी स्वभावासाठी विशेष ओळखले जातात. बायको व आईबरोबरचे हलके फुलके विनोदी रील ते सोशल मीडियाद्वारे शेअर करतात आणि त्यांच्या या व्हिडीओला प्रेक्षकांकडून मिलियन्समध्ये व्ह्यूज मिळतात. अशातच त्यांचे नुकतेच गोवामधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी ५’ फेम धनंजय पवारच्या पत्नीचं नाव कल्याणी असे आहे. धनंजय व कल्याणी यांना दोन गोड मुलं आहेत. कल्याणीचा साड्यांचा व्यवसाय आहे. ‘आईसाहेब वस्त्रम’ असे कल्याणीच्या साड्यांच्या ब्रॅण्डचं नाव आहे. कल्याणी सोशल मीडियावर खूप सक्रिय असून चाहत्यांबरोबर ती अनेक रील व्हिडीओ शेअर करत असते. तर धनंजयही त्यांचा फर्निचरचा व्यवसाय सांभाळत आहेत.