Paaru Marathi Serial Update : ‘पारू’ मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, इकडे मारुती गनीचा अभ्यास घेत असतो. त्याच वेळेला सावित्री येते आणि सांगते की, मला पारुशी कामासंबंधात बोलायचे आहे तेव्हा मारुती सांगतो की, पारू आत मध्येच आहे. त्यानंतर पारूकडे सावित्री जाते आणि सांगते की, लग्नानंतर बाईने पहिली मंगळागौर ही करायची असते. त्यामुळे मला असं वाटतंय की आदित्य बाबाच्या सुखी आयुष्यासाठी तुलाही मंगळागौर पूजा करावीच लागेल. यावर पारू सांगते, पण ती कशी करायची. काय करायचं हे मला काहीच माहिती नाही. यावर सावित्री सांगते की, तू काही काळजी करु नकोस. मी तुला मदत करीन. यावर पारूला सावित्री सांगते की, सकाळी मी पूजा मांडून ठेवीन तोवर तू बंगल्यात जाऊन काम कर. मी फोन केल्यावर तू इकडे ये आणि त्यानंतर मी तिकडे जाईन म्हणजे आपण दोघीही नाही आहोत यामुळे कोणताच गोंधळ होणार नाही. ठरल्याप्रमाणे सगळं काही होत असतं तर दुसऱ्या दिवशी पारू किचनमध्ये काम करत असतानाच तिला दामिनी धरते आणि सांगते की, आज माझ्यासाठी हे खास पदार्थ बनव आणि हे पदार्थ बनेपर्यंत तू किचन मधून बाहेर पाऊल सुद्धा ठेवायचं नाही, असं म्हणत दामिनी स्वतःच किचनमध्ये बसून राहते.
तर इकडे सावित्री पारूला सतत फोन करत असते मात्र पारू ते फोन उचलत नाही. त्यानंतर सावित्री पारूला बोलवायला येते तेव्हा दामिनीला पाहून ती शांतच राहते. दामिनी विचारते, तुमचं काय सुरु आहे. एक गेली की दुसरी येते. तुम्ही काम चुकारपणा करताय का?, यावर सावित्री सांगते नाही तुम्हाला ब्रोकोली सलाड आणि ज्यूस आवडतं पण ब्रोकोली संपली होती म्हणून मी कोणाला तरी आणायला सांगणार होते पण मला कोणी सापडलं नाही म्हणून मी पारुला सांगायला आले असं सांगून ती पारूला ब्रोकली आणायला पाठवते. हे ऐकून दामिनी खूप खुश होते. दामिनी सावित्रीला सांगते की, तू अशी माझी काळजी घेत आहेस, हे ऐकून मला खूप आनंद झाला. त्यानंतर पारू घरी येते पण ती पूजा नेमकी कशी करायची हे तिला कळत नाही म्हणून ती सावित्रीला फोन करते यावर दामिनी सावित्रीचा फोन घेते आणि सांगते की आता तू हा फोन उचलायचा नाही. त्यानंतर पारू प्रियाला फोन करते.
प्रिया पारूचा फोन उचलते तेव्हा अहिल्यादेवी तिच्याबरोबर असतात आणि मंगळागौरीची पूजा करण्याबद्दल प्रिया पारूला विचारते. अहिल्यादेवी तिच्याकडून फोन काढून घेतात. आता खोटं कसं बोलावं म्हणून अहिल्यादेवींना पारू सांगते की, माझ्या मैत्रिणीची पूजा आहे. ती कशी करावी तिला माहित नाही म्हणून मी प्रिया मॅडमला विचारलं त्या गावाकडच्या आहेत म्हणजे त्यांना माहीत असेल असं मला वाटलं. त्यावर अहिल्या देवी स्वतः पूजा कशी करायची सांगतात. तर एकीकडे दिशाने नवीन डाव आखलेला असतो. दिशा प्रीतमला ब्लॅकमेल करते की, तू त्या प्रियाच्या जवळ जाणं बंद कर. नाहीतर प्रियाला बॅग भरून गावाकडे पाठवून देईल आणि हे मला करायला वेळ लागणार नाही आणि असं तुला नको हवं असेल तर तू माझे फोटोज दाखवून कंपनीच्या ब्रँड अंबेसिडरसाठी सासू मॉमशी बोल. हे ऐकल्यावर प्रीतम पहिला नकार देतो मात्र प्रियासाठी तो हे करायला तयार होतो. दुसऱ्या दिवशी सगळेजण बसलेले असतात तेव्हा प्रीतम याबद्दल अहिल्यादेवींशी बोलतो आणि काही फोटो दाखवतो मात्र अहिल्यादेवी श्रीकांत आदित्य सगळे हसतात. अहिल्यादेवी सांगतात हे करायची तुला काहीच गरज नाही. आपली ब्रँड अँबेसिडर पारू आहे आणि पारू आता या पदासाठी योग्य आहे. तुला हवं असेल तुला कामच हवं असेल तर तू आदित्य किंवा प्रीतमला मदत कर.
आदित्य सांगतो हवं तर तू एखादी ब्रांच आपली पूर्ण सांभाळायला घे हे ऐकल्यावर दिशा तिथल्या तिथे डाव पलटते आणि सगळं काही प्रीतमने मुद्दाम केलं असल्याचं सांगते. तेव्हा आदित्य प्रीतमवर भडकतो आणि तिला सॉरी म्हणायला सांगतो. प्रीतम जेव्हा सॉरी म्हणायला जातो तेव्हा प्रिया तिच्या मागून जाते. तेव्हा प्रियाला कळतं की दिशाने हे सगळं काही नाटक केलं आहे. आता मालिकेच्या पुढील भागात नेमकं काय होणार हे पाहणं रंजक ठरेल.