Paaru Marathi Serial New Promo : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ या मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळण पाहायला मिळत आहेत. मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, प्रीतम व प्रियाचं अखेर लग्न झालं असून त्यांच्या लग्नानंतरचे विधी सुरु झाले आहेत. लग्नानंतर प्रिया व प्रीतम यांचा गोंधळाचा कार्यक्रम पार ठेवण्यात येतो, यासाठी किर्लोस्कर मेन्शनमध्ये जोरदार तयारी सुरु असते. गोंधळाला प्रसाद म्हणून अहिल्यादेवींनी नव्या सूनेच्या हाताने गोडाचा शिरा बनवायला सांगितलेला असतो. मात्र पुढील भागात प्रियाचा हा पदार्थ फसतो आणि तिथे पारू आलेली दाखवण्यात आलं आहे. आता पुढे नेमकं काय होणार याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागून राहिलेली असताना आता एका नव्या प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
झी मराठीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन ‘पारू’ मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला पाहायला मिळत आहे की, प्रीतम व प्रिया दोघेही गोंधळाच्या पूजेसाठी बसले आहेत. त्यावेळी प्रियाच्या साडीजवळ दिवा जळत असतो, तो दिवा प्रियाच्या साडीला लागणार इतक्यात पारू व आदित्य दोघेही प्रियाला वाचवण्यासाठी आणि दिवा बाजूला करण्यासाठी एकदमच जातात. पारू प्रियाला विचारते, “प्रिया मॅडम भाजलं नाही ना तुम्हाला?”. प्रिया प्रचंड घाबरलेली असते. गोंधळून प्रिया ‘नाही’ असं म्हणते.
त्यानंतर उरलेलं तेल दिवटीला सर्व वाहून घ्या, असे गुरुजींकडून सांगितले जाते. यावर पारू ‘थांबा, मी देते’, असे म्हणत दिवटीला तेल घालत असतानाच आदित्यदेखील ते तेल घालण्यासाठी गडबडीत हात पुढे करतो. आणि मग पारू व आदित्यकडून दिवटीला तेल घातले जाते. त्यावेळी सावित्री मनातल्या मनात म्हणते, “देवी माऊलीचीच इच्छा होती की, दिवटीला तेल घरातल्या थोरल्या सूनेकडूनच घातलं जावं”. हा प्रोमो शेअर करत, “देवीआईची इच्छा पूर्ण होणार, दिवटीला घरातल्या मोठ्या सूनेकडून तेल वाहिलं जाणार”, असं कॅप्शन देण्यात आलं आहे.
पारू व आदित्य यांच्यातील हे गुपित नातं सर्वांसमोर केव्हा येणार?, पारू पुढाकार घेऊन त्यांच्या नात्याबाबद्दल सांगणार का?, आदित्य पारूच्या प्रेमात पडला आहे हे त्याला कळणार का?, आणि महत्वाचं म्हणजे, अहिल्या देवी किर्लोस्कर पारूचा किर्लोस्करांची सून म्हणून स्वीकार करणार का, हे पाहणं रंजक ठरेल.