‘बिग बॉस मराठी’मुळे घराघरात पोहोचलेली लोकप्रिय जोडी म्हणजे अमृता देशमुख व प्रसाद जवादे. ‘बिग बॉस’च्या घरात असताना झालेल्या मैत्रीचे रूपांतर ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यावर प्रेमात झालं. कालांतराने ही जोडी बरेचदा एकत्र स्पॉट होताना दिसली मात्र त्यांच्यात तसं काही नसल्याचं त्यांनी सांगितलं त्यानंतर थेट साखरपुड्याचे फोटो शेअर करत प्रसाद-अमृताने प्रेमाची कबुली दिली. त्यानंतर काही दिवसातच प्रसाद व अमृता लग्न बंधनात अडकले. प्रसाद व अमृता ही नेहमी चर्चेत असणारी जोडी आहे. सोशल मीडियावर ही जोडी बऱ्यापैकी सक्रीय असते. (Amruta Deshmukh And Prasad Jawade)
विविध कंटेंट व्हिडीओ तयार करत ही जोडी चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. सध्या प्रसाद ‘पारू’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहे. आदित्य किर्लोस्कर असं जबाबदारीचे पात्र प्रसाद साकारत आहे. ‘पारू’ या मालिकेचं शूटिंग सध्या सातारा येथे सुरु आहे त्यामुळे प्रसादला घरापासून, कुटुंबापासून दूर राहून हे चित्रीकरण करावं लागत आहे. अशातच मध्ये मध्ये अमृता त्याला साताऱ्याला भेटायला ही जात असते. एकत्र वेळ घालवता यावा म्हणून ते सातारा, पुणे असा दौरा करताना दिसतात.
अमृताने तिच्या युट्युब चॅनेल वर एक ब्लॉक शेअर केला आहे. या ब्लॉगमध्ये प्रसादने अमृताला सरप्राइज दिलेलं पाहायला मिळत आहे. अमृता बरेचदा प्रसादजवळ साताऱ्यात आली आहे. मात्र तिला चित्रीकरणाचे ठिकाण लांब असल्याने त्याचे चित्रीकरण पाहायला जाता आलेलं नाही. एक दोनदा ती सेटवर गेली आहे पण यानंतर आता घराजवळचं चित्रीकरण असलेल्या ठिकाणी अमृता चित्रीकरण पाहायला आली आहे. पारुच्या लग्नाआधी देवदर्शनाला जातानाचा हा सीन आहे. हा सीन पाहण्यासाठी अमृता खास आलेली आहे. या सीनबद्दल सांगताना प्रसादने अमृताला असं सांगितलं होतं की, मी पारूला दीडशे पायऱ्या उचलून घेऊन येणार आहे. त्यामुळे अमृता ही खूप उत्सुक आहे पण सीनदरम्यान आदित्य पारुला नाही तर एका आजीबाईंना दीडशे पायऱ्या उचलून घेऊन येतो हे पाहून अमृता शॉकच होते.
प्रसादने दिलेलं हे खास सरप्राईज अमृताला खूपच आवडलेलं पाहायला मिळतंय. कामाप्रती, अभिनयाप्रती प्रसादची असलेली आवड, मेहनत हे पाहून अमृता खूप खुश होते. सध्या अमृता ही रंगभूमी गाजवताना दिसत आहे. ‘नियम व अटी लागू’ या नाटकाद्वारे रंगभूमीवर आपल्या अभिनयाची छाप पाडताना दिसत आहे. नाटकासाठी ती अनेकदा दौरेही करताना दिसते.