शनिवार, एप्रिल 4, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : ऐश्वर्या व अविनाश नारकरांचा लेक पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला रवाना, एअरपोर्टवर झाले भावुक, व्हिडीओ व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 30, 2024 | 11:18 am
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
avinash-aishwarya narkar son

Video : ऐश्वर्या व अविनाश नारकरांचा लेक पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला रवाना, एअरपोर्टवर झाले भावुक, व्हिडीओ व्हायरल

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडीच्या यादीत एका जोडीचं नाव आवर्जून घेतलं जात ते म्हणजे ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकर. नारकर कपलची ही जोडी सिनेविश्वात नेहमीच चर्चेत असते. आजवर ऐश्वर्या व अविनाश यांनी मराठी मालिका, चित्रपट यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. सोशल मीडियावरही दोघेही बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच ही जोडी रील व्हिडीओमुळे चर्चेत असते.सोशल मीडियावरुन काही ना काही शेअर करत दोघेही कायम चर्चेत असतात. (avinash-aishwarya narkar sonavinash-aishwarya narkar son)

अशातच अविनाश यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. अविनाश यांनी ही पोस्ट त्यांचा लेक अमेयसाठी केली आहे. अमेय या आई-वडिलांसारखा या सिनेसृष्टीत कार्यरत आहे. अभिनय नव्हे तर दिग्दर्शनाची धुरा सांभाळण्यात त्याचा कल आहे. अमेय आता परदेशात शिक्षणासाठी जात असल्याचं समोर आलं आहे. अमेयने परदेशात जाऊन शिक्षण घेणार असून त्यासाठी त्याच्या आई-वडिलांचा म्हणजे ऐश्वर्या व अविनाश यांचा पूर्ण पाठिंबा आहे.

आणखी वाचा – प्रतिमाची स्मृती परत येणार का?, सायलीमुळे तिला भूतकाळातल्या गोष्टी आठवतील का?, मालिकेत येणार रंजक ट्विस्ट

View this post on Instagram

A post shared by Avinash Narkar (@avinash.narkar)

अमेयसाठी खास पोस्ट शेअर करत त्यांनी असं लिहिलं आहे की, “आज आमचा मन्या. आमचा अमेय पुढच्या शिक्षणासाठी अमेरिकेला निघाला. नवनवीन गोष्टी जाणून घेण्याचं व शिकण्याचं तुझ्या डोळ्यातलं, मनातलं कुतुहल असंच कायम जागं राहू दे मन्या. कोणीही दुखावलं जाईल असं काही करु नकोस. कायम आनंदी रहा आणि तुझ्या कामातून सगळ्यांना आनंद दे. आमचे सगळ्यांचं भरभरुन प्रेम व आभाळभर आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहेतच बब्बु. यशस्वी भव”.

आणखी वाचा – निक्की तांबोळी अरबाजच्या प्रेमात?, दोघांमध्ये फुलणार प्रेम, इतर सदस्यांनीही उडविली खिल्ली

View this post on Instagram

A post shared by Avinash Narkar (@avinash.narkar)

शिवाय आणखी एक व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघेही लेकाला एअरपोर्टवर सोडायला जाताना दिसत आहेत. “मन्या. बब्बू तुला खूप खूप खूप खूप शुभेच्छा. तुझा हा प्रवास सुरक्षित व यशस्वी होवो”, असं म्हणत त्याला निरोप देताना दिसत आहेत. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी अमेयला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर काहींनी या पोस्टला पसंती दर्शविली आहे.

Tags: Aishwarya and Avinash Narkaraishwarya narkaravinash narkaravinash-aishwarya narkar son
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Famous Marathi Actor Son Name Ceremony
Entertainment

मराठमोळ्या अभिनेत्याने थाटात साजरा केला लेकाचा नामकरण सोहळा; हटके अंदाजात सांगितलं मुलाचं नाव

एप्रिल 4, 2026 | 1:12 pm
Rashmika and Vijay Devarkonda New Update
Entertainment

रश्मिका होणार आई? चाहत्यांना दिली GOOD NEWS; ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण

एप्रिल 4, 2026 | 12:05 pm
Piyush Mishra On Alcoholism
Entertainment

आईला नको नको ते बोलले, महिलांशी अश्लील संवाद केला; दारूच्या नशेत अभिनेत्याच्या आयुष्याची लागलेली वाट, म्हणाले…

एप्रिल 4, 2026 | 11:00 am
Dipika kakar health update
Entertainment

“शरीरातून १.३ सेमी…”, शस्त्रक्रियेनंतर सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या पायाखालची जमीन सरकली, आधी कॅन्सरने ग्रासलं आणि…

एप्रिल 4, 2026 | 9:28 am
Next Post
Suraj Chavan Income

सूरज चव्हाणची एका दिवसाची कमाई ऐकून सेलिब्रिटींनाही धक्का, कमावतो तब्बल…; म्हणाला, "आधी मला खूप लोकांनी लुटलं अन्…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.